Sudhakar Kohale Has Slipped into Depression Seeing Defeat Ahead; Abhijit Wanjari Hits Back Strongly : २०१४ ते २०१९ मधील एक काम दाखवा’; सुधाकर कोहळेंना अभिजीत वंजारींचे खुले आव्हान
Nagpur : नागपूर पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी आणि भाजपचे माजी आमदार तसेच नागपूर पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे संभाव्य उमेदवार सुधाकर कोहळे यांच्यात सध्या जोरदार राजकीय युद्ध पेटल्याचे पाहायला मिळत आहे.
सुधाकर कोहळे यांनी आमदार वंजारी यांच्यावर हे भिक मागणारे नेते अशी अत्यंत बोचरी टीका केली होती. कोहळेंच्या या विधानाचा खरपूस समाचार घेत आमदार अभिजीत वंजारी यांनी त्यांच्यावर अत्यंत टोकदार शब्दांत पलटवार केला असून, दुसऱ्यांवर बोट दाखवण्यापूर्वी कोहळेंनी स्वतःची कार्यक्षमता तपासावी आणि शब्द जपून वापरावेत, असा सज्जड दम भरला आहे. सोबतच पराभव दिसत असल्याने कोहळे हे नैराश्यात गेले असल्याचीही टीका केली आहे.
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांची ‘रामरक्षा आंदोलन’ची घोषणा
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येत्या सहा महिन्यात होऊ घातली आहे. काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षाच्यावतीने पदवीधरांच्या नोंदणीचा कार्यक्रम हाती घेतली आहे. आमदार अभिजीत वंजारी यांच्या विरोधात भाजपच्यावतीने कोहळे निवडणूक लढणार आहे. त्यांना नोंदणी प्रमुख केले आहेत. तेव्हापासून कोहळे सातत्याने मतदारसंघात सहा मतदारसंघाच्या पदवीधर मतदारसंघात दौरे करीत आहेत. मात्र कोहळे यांच्या नावाला भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांचा विरोध आहे, त्यांच्या मतदारसंघासोबत काहीही संबंध नसल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे असल्याचा दावा वंजारी यांनी केला.
प्रचार आणि नोंदणी दरम्यान प्रत्येक ठिकाणी त्यांना माझेच काम दिसते हे बघून निवडणुकीपूर्वीच त्यांना घाम फुटला आहे. माझ्यावर अतिशय खालच्या भाषेत टीका करून ते आपला रोष व्यक्त करीत आहेत. कदाचित माझ्यावर आरोप केल्यानंतर भाजपचे तिकीट पक्के होऊल असाही त्यांचा कयास असावा असा टोलाही वंजारी यांनी कोहळे यांना लगावला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली डाळ शिजत नसल्याची बघून ते अशी वक्तव्ये करत असावे असेही वंजारी म्हणाले.
Sajid khan pathan : ‘आता फोन नाही, थेट गोळी येईल कथित बिश्नोई गँगचा इशारा, विधानसभेतही प्रश्न गाजला
सुधाकर कोहळे यांच्या या आरोपांना आमदार अभिजीत वंजारी यांनी कागदोपत्री पुराव्यांसह चोख प्रत्युत्तर दिले. कोहळेंच्या कार्यक्षमतेवरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत वंजारी म्हणाले, माझे काम नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांतील जनतेला आणि पदवीधरांना चांगलं ठाऊक आहे. मी शिक्षक आणि पदवीधरांचे प्रश्न सातत्याने सोडवले असून, माझ्या कामाचा संपूर्ण गोषवारा (लेखाजोखा) घेऊनच मी जनतेमध्ये फिरत असतो. कोहळे मला निष्क्रिय म्हणतात, पण २०१४ मध्ये ते दक्षिण नागपूरमधून आमदार म्हणून निवडून आले होते. त्या कार्यकाळात त्यांनी दक्षिण नागपूरसाठी केलेले एक तरी काम कागदोपत्री पुराव्यासह दाखवून द्यावे. त्यांनी एखादा मोठा विषय लावून धरला आणि तो मुद्दा गाजवला, याचा एकतरी पुरावा सादर करावा. ते निष्क्रिय असल्यामुळे त्यांचे दक्षिण नागपूरमधील तिकीट भाजपच्या नेत्यांनी कापले होते असाही टोला वंजारी यांनी पत्रकारांसोबत बोलताना लगावला.








