व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Akola Municipal corporation : कुलूप तोडून कार्यालयात घुसखोरी; विरोधी पक्षनेत्यासह पाच जणांवर...

Akola Municipal corporation : कुलूप तोडून कार्यालयात घुसखोरी; विरोधी पक्षनेत्यासह पाच जणांवर गुन्हा

Office break-in after the lock was broken; case registered against five, including the Leader of Opposition : महानगरपालिकेच्या कामकाजात अडथळा, पोलिसांकडून पंचनामा

Akola अकोला महानगरपालिकेच्या आवारात बेकायदेशीर जमाव करून विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयात जबरदस्तीने प्रवेश करत तोडफोड व गोंधळ घातल्याप्रकरणी विरोधी पक्षनेत्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी वरिष्ठ लिपिक राजेश रामदास जाधव (वय ५८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १९१(२), १९०, ३२९(३) आणि ३२९(४) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ५:१० वाजता विरोधी पक्षनेते डॉ. झिशान हुसैन, आझाद खान, शेख अब्दुल शेख सलीम, इलियास खान, जावेद शेख आणि बबलू खान (सर्व रा. अकोला) यांनी संगनमत करून महानगरपालिकेच्या आवारात बेकायदेशीर जमाव जमवला. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी, आरडाओरड व शिवीगाळ करत विरोधी पक्षनेत्याचे बंद असलेले कार्यालय गाठले.

Akola Municipal corporation : स्थायी समिती सभापती ‘ॲक्शन मोड’वर; विभाग प्रमुखांची झाडाझडती

 

तक्रारीनुसार, संबंधितांनी कार्यालयाचे कुलूप तोडून जबरदस्तीने आत प्रवेश केला. तसेच कार्यालयातील वस्तूंची तोडफोड करून परिसरात गोंधळ निर्माण केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे महानगरपालिकेच्या कामकाजात काही काळ अडथळा निर्माण झाल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणत पंचनामा केला. पुढील तपास सिटी कोतवाली पोलिसांकडून सुरू असून, संबंधित आरोपींची भूमिका आणि घटनेमागील नेमके कारण शोधले जात आहे.

error: Content is protected !!