व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Akola Municipal corporation : नाले गाळाने तुडुंब, मग १.०९ कोटींचा खर्च कुठे?;...

Akola Municipal corporation : नाले गाळाने तुडुंब, मग १.०९ कोटींचा खर्च कुठे?; नालेसफाईवरून मनपा प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Questions raised over the Municipal Corporation administration’s handling of drain-cleaning work : २६५ नाल्यांच्या सफाईचा दावा; प्रत्यक्षात अनेक भागांत गाळ, प्लास्टिक आणि कचऱ्याचे साम्राज्य

Akola महानगरपालिकेने शहरातील २६५ प्रमुख नाल्यांच्या साफसफाईसाठी १ कोटी ९ लाख रुपयांचा खर्च केल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात अनेक प्रमुख नाले आजही गाळ, प्लास्टिक आणि कचऱ्याने भरलेले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एवढा मोठा निधी नेमका कुठे खर्च झाला, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

यंदा तब्बल १३ वर्षांनंतर प्रथमच नालेसफाईची कामे निविदा प्रक्रियेद्वारे कंत्राटदाराला देण्यात आली. मात्र, मोठा निधी खर्च करूनही शहरातील नाल्यांची स्थिती फारशी बदललेली नसल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. टिळक रोड, मोठी उमरी, जठारपेठ, न्यू तापडिया नगर, बिर्ला गेट, कौलखेड आणि मलकापूर परिसरातील अनेक नाल्यांमध्ये अद्याप गाळ साचलेला दिसून येत आहे. काही ठिकाणी नाल्यातून काढलेला गाळही कंत्राटदाराने नाल्याच्या कडेला तसाच टाकून दिल्याचे निदर्शनास आले आहे.

Govinda pathak : गोविंदा पथकांप्रमाणे कावडधारकांनाही समूह अपघात विमा द्या; उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही नालेसफाईचा मुद्दा गाजला होता. प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी न करताच काम पूर्ण झाल्याचे जाहीर केल्याचा आरोप सदस्यांनी केला होता.

महापालिकेने ११२ किलोमीटर लांबीच्या २६५ प्रमुख नाल्यांच्या साफसफाईसाठी निधी मंजूर केला होता. दुसरीकडे शहरातील सुमारे ७०० किलोमीटर लांबीचे लहान व मध्यम नाले अद्यापही स्वच्छतेच्या प्रतीक्षेत आहेत. विशेष म्हणजे, स्वच्छता विभागाने शंभर टक्के नालेसफाईचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात किती नाल्यांची सफाई झाली याची अधिकृत आकडेवारी विभागाकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.

महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी सांगितले की, मोठ्या नाल्यांच्या साफसफाईसाठी कंत्राट देण्यात आले असून, पूर्ण झालेल्या कामांची अभियंत्यांकडून प्रत्यक्ष पडताळणी केली जात आहे. बांधकाम विभागाकडून संपूर्ण कामाचा आढावा घेण्यात येणार आहे.

Sharad Pawar NCP: शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये जाणार?; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीची शक्यता

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे गटनेते नगरसेवक नीलेश देव यांनी, दरवर्षी लाखो रुपये खर्च करूनही नाले गाळाने भरलेलेच असल्याने या खर्चाचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित केला. पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरत असेल, तर नालेसफाईवर खर्च केलेल्या कोट्यवधी रुपयांचा फायदा काय, असा सवालही त्यांनी केला.

error: Content is protected !!