व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Amravati Airport : ‘टेक ऑफ’ ठरले! अमरावती विमानतळ 16 एप्रिलपासून सेवेत

Amravati Airport : ‘टेक ऑफ’ ठरले! अमरावती विमानतळ 16 एप्रिलपासून सेवेत

Amravati-Mumbai Flights on three days a week : आठवड्यातून तीन दिवस Active; मुंबईसाठी Alliance Airlines चे विमान

Amravati अमरावती विमानतळाचे लोकार्पण १६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते होणार आहे. या विमानतळावरून आठवड्यातून तीन दिवस— सोमवार, बुधवार आणि शुक्रवार—मुंबईसाठी थेट विमानसेवा उपलब्ध होणार आहे. मंगळवारी अलायन्स एअर लाइन्सच्या Alliance Airlines संकेतस्थळावर या विमानसेवेचे अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध झाले.

वर्षानुवर्षे प्रतीक्षेत असलेल्या अमरावती विमानतळाचा लोकार्पण सोहळा अखेर ठरला आहे. हे विमानतळ विदर्भातील अर्थव्यवस्था, व्यापार, पर्यटन आणि हवाई संपर्क यांसाठी गेमचेंजर ठरणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (MADC) उडान योजनेअंतर्गत हे विमानतळ विकसित केले असून, हे केवळ पायाभूत सुविधा नव्हे, तर उद्योग आणि प्रवाशांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.

Accident in Wardha : पोलीस कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात चौघे ठार!

अमरावती विमानतळाला IATA (आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना) कोड ‘AVT’ प्राप्त झाला आहे. या कोडमुळे प्रवाशांना आरक्षण आणि तिकिट बुकिंग सुलभ होणार आहे. मंगळवारी अलायन्स एअरच्या संकेतस्थळावर ‘AVT’ कोडसह अमरावती विमानसेवेची माहिती झळकली.

MADCच्या संचालक स्वाती पांडे Swati Pande यांनी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना पत्र पाठवून लोकार्पण सोहळ्याबाबत माहिती दिली आहे. १६ एप्रिल रोजी मुंबईहून सकाळी ८:४५ वाजता अलायन्स एअरचे विशेष विमान अमरावतीकडे रवाना होईल. लोकार्पण सोहळ्यानंतर ११:३० वाजता हे विमान पुन्हा मुंबईसाठी निघेल. या पार्श्वभूमीवर सुरक्षा व कार्यक्रम व्यवस्थापनाची तयारी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Electricity bill Overdue : वीज वितरण कंपनीची ग्रामपंचायतींना नोटीस!

विमानतळाची वैशिष्ट्ये

धावपट्टी : १८५० मीटर लांब व ४५ मीटर रुंद
क्षेत्रफळ : ३८९ हेक्टर
उड्डाण करणारे विमान : अलायन्स एअरची ATR-72
सुविधा : नाईट लँडिंग यंत्रणा उभारणी अंतिम टप्प्यात

error: Content is protected !!