rohit-pawar-campaign-for-sunetra-pawar-baramati-by-election-ghongadi-sabha : रोहित पवारांचा घोंगडी सभांमधून जनसंपर्क दौरा
Baramati: बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार मैदानात उतरले आहेत. काटेवाडी गावातून घोंगडी बैठकीच्या माध्यमातून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ करत बारामतीत जनसंपर्काचा धडाका सुरू केला आहे. या वेळी राजेंद्र पवार आणि सई पवार यांचीही उपस्थिती होती.
प्रचारादरम्यान बोलताना रोहित पवार यांनी दिवंगत अजित पवार यांच्याशी असलेल्या भावनिक नात्याचा उल्लेख करत आठवणींना उजाळा दिला. लहानपणी त्यांच्या प्रचारासाठी सायकल रॅली काढल्याचे सांगत त्यांनी अजित पवार यांनी अनेकांना राजकारणात संधी दिल्याचे नमूद केले. आजही अनेकांना त्यांची उणीव जाणवत असून त्यांच्या कार्यामुळेच लोक प्रचारात सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
Nagpur municipal corporation: नागपूर महापालिकेत भाजपकडून ‘युती धर्म’, शिवसेनेच्या सूरज गोजेंना लॉटरी
या निवडणुकीत मोठ्या पक्षांनी उमेदवार न देत बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न झाल्याचा उल्लेख करत रोहित पवार यांनी अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. बारामतीतील प्रत्येक मत सुनेत्रा पवार यांच्या बाजूने जावे यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. बारामतीकरांना आदेश देता येत नाही, मात्र विनंती करता येते, असे म्हणत त्यांनी मतदारांशी भावनिक संवाद साधला.
रोहित पवार यांनी सांगितले की, हा प्रचार दौरा नसून लोकांच्या गाठीभेटी घेण्याचा प्रयत्न आहे. आपण नेता म्हणून नव्हे तर अजित पवार यांचा कार्यकर्ता आणि पुतण्या म्हणून प्रचारात उतरलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्या निधनानंतर या पोटनिवडणुकीत प्रचारासाठी यावे लागत असल्याचे त्यांनी दुर्दैवी असल्याचेही नमूद केले.
Nagpur municipal corporation : नागपूर भाजपमध्ये अखेर ‘डॅमेज कंट्रोल’; नाराजांचे राजकीय पुनर्वसन!
शरद पवार यांच्या भूमिकेचाही उल्लेख करत त्यांनी सांगितले की, ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न झाले होते. काँग्रेसकडून उमेदवारी मागे घेण्याबाबत चर्चा झाली होती आणि त्यासाठी काही अटीही होत्या. अखेरीस अनेक नेत्यांच्या प्रयत्नांमुळे प्रमुख पक्ष रिंगणात नसल्याचे चित्र निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
जय पवार यांच्यासोबत संयुक्त प्रचाराबाबत विचारले असता रोहित पवार यांनी सर्वजण आपापल्या स्तरावर वेगवेगळ्या भागात प्रचार करत असल्याचे सांगितले. यामुळे प्रचाराची व्याप्ती वाढते, असे त्यांनी स्पष्ट केले. सांगता सभेला एकाच मंचावर येणार का, याबाबत त्यांनी स्पष्ट उत्तर देत संवाद न झाल्यामुळे आपण उपस्थित राहिलो नाही, असे सांगितले आणि पुढील कार्यक्रमाबाबत अनिश्चितता कायम असल्याचे सूचित केले.
मताधिक्याबाबत बोलताना रोहित पवार यांनी आत्मविश्वास व्यक्त करत सुनेत्रा पवार यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणात मतदान होईल, असा दावा केला. विरोधात उभे असलेल्या उमेदवारांना नगण्य मते मिळू शकतात, तर बहुसंख्य मते सुनेत्रा पवार यांनाच मिळतील, असे त्यांनी नमूद केले. बारामतीत अजित पवार यांच्याबद्दल असलेले प्रेम आणि आदरच या निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
___








