Threats to Mumbai and Delhi High Courts via email : मुंबई व दिल्ली हायकोर्टाला ई-मेलद्वारे धमकी
Mumbai : मुंबई हायकोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने न्यायालयात खळबळ उडाली आहे. दुपारी २ वाजता बॉम्बस्फोट घडवून आणला जाणार असल्याचा मजकूर असलेला मेल हायकोर्टाच्या रजिस्टर ऑफिसमध्ये प्राप्त झाला. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व न्यायाधीश, वकील आणि कोर्टातील कर्मचारी यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. बॉम्बशोधक पथक आणि पोलिसांचे ताफे घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे.
या मेलमध्ये पाकिस्तान आणि तामिळनाडू यांचा उल्लेख करण्यात आला आहे. मजकुरात म्हटले आहे की, “बॉम्ब स्फोटांसाठी शुक्रवार पवित्र. जज रूम व कोर्ट परिसरात तीन बॉम्ब ठेवले आहेत. दुपारी २ वाजेपर्यंत इमारत खाली करा.” या ई-मेलमुळे मुंबई हायकोर्टासोबतच दिल्ली हायकोर्टालाही सुरक्षा यंत्रणांनी रिकामे केले.
Sudhir Mungantiwar : अपघातग्रस्तांसाठी तात्काळ धावून आले आ. सुधीर मुनगंटीवार
धमकीची माहिती मिळताच पोलिसांनी सर्व कोर्टरूममध्ये स्टे अलर्टचा संदेश दिला. तत्काळ रिकामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली. हायकोर्टाची संपूर्ण इमारत खाली करून तपासणी सुरू करण्यात आली आहे. बॉम्ब स्कॉड पथक सध्या इमारतीची खोदून छाननी करत आहे.
नुकताच स्पेशल सेलने देशभरातून पाच संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. बुधवारी आणि गुरुवारी झालेल्या सलग कारवायांमध्ये या पाच जणांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली. त्यामुळे हायकोर्टाला मिळालेल्या या धमकीचा आणि अटक केलेल्या दहशतवाद्यांचा काही संबंध आहे का, याची चौकशी सुरू आहे.
Dabki Road POCSO case : ५ हजार किमीचा थरारक पाठलाग, आरोपींच्या मुसक्या आवळल्या
धमकीच्या या घटनेनंतर मुंबई शहराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यंत्रणा सतर्क असून तपास सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाशी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
____