व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home क्राईम Dabki Road POCSO case : ५ हजार किमीचा थरारक पाठलाग, आरोपींच्या मुसक्या...

Dabki Road POCSO case : ५ हजार किमीचा थरारक पाठलाग, आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Accused arrested after a 5,000-kilometer pursuit : डाबकी रोड पोक्सो प्रकरणातील आरोपीला अटक, हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा

Akola डाबकी रोड परिसरात अल्पवयीन मुलीवर चाकूच्या धाकाने लैंगिक अत्याचार करून फरार झालेल्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांनी तब्बल ५ हजार किमी पाठलाग केल्यानंतर इंदौर (मध्यप्रदेश) येथून अटक केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात दिलासा व्यक्त होत आहे. या घटनेतील आरोपीला कठोर शासन व्हावे या मागणीसाठी बजरंग दल व विश्व हिंदू परिषद, भोई समाजाच्या वतीने अकोला येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

गुन्ह्याची पार्श्वभूमी

दि. ६ सप्टेंबर २०२५ रोजी डाबकी रोड पोलिस ठाण्यात अल्पवयीन पीडितेच्या तक्रारीवरून पोक्सो कायद्यासह बी.एन.एस.च्या कलमानुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी तौहिवखान समीरखान बैद (वय २८, रा. खैर मोहम्मद प्लॉट, डाबकी रोड, अकोला) याने पीडितेचे आई-वडील गणेश विसर्जनासाठी बाहेर गेल्याची संधी साधत घरात घुसून चाकूच्या धाकावर अत्याचार केला होता.

CPRadhakrishnan : सी.पी. राधाकृष्णन देशाचे १५ वे उपराष्ट्रपती!

 

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके तयार करण्यात आली.

आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्यप्रदेश अशा विविध राज्यांत शोधमोहीम राबवली. आरोपीने सतत रेल्वे व बस प्रवास करून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. जवळपास २५० सीसीटीव्ही फुटेज तपासणे, १२ गाड्या व विविध लॉज-धर्मशाळा चेक करणे, विमान-रेल्वे-बस अशा सर्व मार्गाने प्रवास करणे अशा थरारक प्रयत्नांनंतर शेवटी आरोपीचा ठावठिकाणा लागला.

Reservation controversy : इडब्ल्यूएसचे 10% आणि ओपनमधील 50% आरक्षण नको का?

इंदौर बायपास परिसरात मोठ्या शिताफीने सापळा रचून अखेर पोलिसांनी आरोपीला पकडण्यात यश मिळवले. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर बलात्कार, चोरी, मारहाण, धमकी अशा गंभीर गुन्ह्यांचे एकापेक्षा अधिक दाखले विविध पोलीस ठाण्यात आहेत.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार, तसेच सायबर शाखेचे जवान सहभागी होते. संपूर्ण मोहिमेत अकोला पोलिसांच्या १० अधिकाऱ्यांनी व ४० अंमलदारांनी अहोरात्र मेहनत घेतली.

error: Content is protected !!