व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Chandrashekhar bawankule : तुमचा पराभव तर निश्चित आहे, मग पेट्रोल-पैसा कशाला वाया...

Chandrashekhar bawankule : तुमचा पराभव तर निश्चित आहे, मग पेट्रोल-पैसा कशाला वाया घालवता?; बावनकुळेंचा विरोधकांना थेट टोला

Chandrashekhar bawankule targets opponents on campaign of legislative election: विधान परिषदेच्या रणधुमाळीत काँग्रेसची धाकधूक वाढली

Nagpur राज्यातील १७ विधान परिषद मतदारसंघांतील निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असतानाच, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना, विशेषतः काँग्रेसला अत्यंत टोकदार सल्ला दिला आहे. संख्याबळाचा विचार करा आणि निवडणुकीतून माघार घ्या, पराभूत तर होणारच आहात; मग उगीच इंधन आणि पैशांचा अपव्यय कशाला करता? असा खोचक सवाल बावनकुळे यांनी केला आहे. विदर्भातील नागपूरसह वर्धा-चंद्रपूर-गडचिकरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ आणि अमरावती या पाचही मतदारसंघात भाजप महायुतीचेच उमेदवार जिंकणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

यवतमाळमध्ये काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने कालच आपला अर्ज मागे घेऊन महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी विदर्भातील उर्वरित जागांवरही काँग्रेसने वास्तव ओळखावे, असे म्हटले आहे. संपूर्ण देशात इंधन टंचाई असताना केवळ राजकीय हट्टापायी पैशांचा आणि इंधनाचा दुरुपयोग करण्यात काही अर्थ नाही, असे सांगत त्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले. भाजपकडे सर्वाधिक संख्याबळ असल्याने विरोधकांचा पराभव निश्चित आहे, त्यामुळे काही अपक्ष उमेदवारांनीही माघार घ्यावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून दुपारपर्यंत सकारात्मक निर्णय होतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

School bus fare : शालेय बस प्रवास महागला; जूनपासून १५ टक्के भाडेवाढ लागू

विशेषतः नागपूरमध्ये भाजपचे राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट सामना रंगणार आहे. मात्र, गणिताचा विचार केल्यास भाजपकडे सुमारे ५०० मते आहेत, तर काँग्रेसकडे केवळ २०० मतदारांचे बळ आहे. तब्बल ३०० मतांचा हा मोठा फरक असल्याने ही निवडणूक जिंकणे काँग्रेससाठी जवळपास अशक्य मानले जात आहे. त्यातच पक्षांतर्गत असलेली तीव्र गटबाजी पाहता, अतुल लोंढे यांना स्वतःच्या पक्षाची मते पदरात पाडण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

Ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेत ८१ लाख अपात्र लाभार्थ्यांना कोट्यवधींचा लाभ

दुसरीकडे, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातील राजकीय घडामोडींनी वेगळेच वळण घेतले आहे. येथील काँग्रेसचे अनेक नगरसेवक अचानक गायब झाले असून त्यांना सहलीसाठी गोव्याला नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त करत भाजपने आमचे नगरसेवक पळवल्याचा आरोप केला आहे. जे नगरसेवक गायब आहेत त्यांच्या घरावर पक्षाचा ‘व्हीप’ लावा आणि पक्षाच्या विरोधात मतदान करणाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी करा, अशी आक्रमक मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. या सर्व घडामोडींमुळे विधान परिषदेच्या रिंगणात विरोधकांची धाकधूक वाढली असून आज दुपारी ३ वाजेपर्यंत कोण माघार घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!