व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Cockroach janta party : अभिजीत दीपके भारतात दाखल, दिल्ली विमानतळावर समर्थकांची मोठी...

Cockroach janta party : अभिजीत दीपके भारतात दाखल, दिल्ली विमानतळावर समर्थकांची मोठी गर्दी

cockroach-janta-party-protest-delhi-jantar-mantar-abhijeet-dipke-arrives-india : जंतरमंतर आंदोलनासाठी पोलिसांची हिरवी झेंडी

New Delhi : देशाच्या राजधानीत आज होणाऱ्या बहुचर्चित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीला मोठे यश मिळाले आहे. जंतरमंतर येथे आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनासाठी दिल्ली पोलिसांनी अधिकृत परवानगी दिली असून पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके अमेरिकेतून भारतात दाखल झाले आहेत. त्यांच्या आगमनानंतर दिल्ली विमानतळ परिसरात समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

अभिजीत दीपके दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचताच त्यांच्या स्वागतासाठी अनेक समर्थक उपस्थित होते. विमानतळाबाहेर येताना त्यांच्या हातात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक होते. या क्षणाचे छायाचित्र आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून समर्थकांकडून त्याचे स्वागत केले जात आहे.

Natural gas : तुटवड्याच्या काळात, अंदमान समुद्रात नैसर्गिक वायूचा मोठा साठा सापडला !

कॉकरोच जनता पार्टीने देशातील शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर आवाज उठवत जंतरमंतर येथे आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व अभिजीत दीपके स्वतः करणार असून देशभरातील विद्यार्थी, युवक आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या परवानगीनुसार, ६ जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जंतरमंतर येथे आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे. परवानगी मिळाल्यानंतर अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून समर्थकांना माहिती देत शांततेत आणि लोकशाही मार्गाने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

समर्थकांना उद्देशून त्यांनी म्हटले आहे की, कोणत्याही पोलीस ठाण्याबाहेर गर्दी न करता सर्वांनी थेट जंतरमंतरवर यावे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित त्रुटींविरोधात हे आंदोलन करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी समाविष्ट असल्याचे सांगितले जात आहे. विविध परीक्षा प्रक्रियांमधील कथित गैरव्यवहार, विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांची गरज या मुद्द्यांवर आंदोलनकर्ते आपली भूमिका मांडणार आहेत.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. जंतरमंतर, संसद मार्ग आणि परिसरातील संवेदनशील भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्थेसाठी दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलांच्या जवानांसह हजारो सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Paver block work : पेव्हर ब्लॉकच्या कामांवर नियंत्रण, कंत्राटदारांचे टेंशन वाढले

दिल्ली विमानतळापासून मध्य दिल्लीपर्यंतच्या प्रमुख मार्गांवर अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून वाहनांची तपासणी आणि देखरेख वाढविण्यात आली आहे. तसेच महत्त्वाच्या सरकारी कार्यालये आणि वरिष्ठ नेत्यांच्या निवासस्थानांबाहेरही सुरक्षा कडक करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांकडून आंदोलनासाठी परवानगी मिळाल्यामुळे कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अभिजीत दीपके यांच्या भारत आगमनासोबतच मिळालेली ही परवानगी पक्षासाठी मोठे यश मानली जात असून आजच्या आंदोलनाकडे देशभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!