Every day new incident What is the fault of Mayuri Sneha Vaishnavi Nikki : रोज नवी घटना, मयुरी. स्नेहा, वैष्णवी, निक्की चा नेमका दोष काय ?
हुंडा प्रथा ही भारतीय समाजाच्या संस्कृतीत खोलवर रुतलेली कीड आहे. प्रगतीच्या, समानतेच्या, महिलांच्या सशक्तीकरणाच्या चर्चा जोरात सुरू असताना, प्रत्यक्षात मात्र मयुरी, स्नेहा, वैष्णवी, निक्की यांसारख्या तरुणींची स्वप्नं काही महिन्यांतच चिरडली जात आहेत. हे केवळ वैयक्तिक शोकांतिकांचे किस्से नाहीत, तर आपल्या समाजाच्या सामूहिक अपयशाची साक्ष आहेत.
आज गावोगाव मुलींची कमतरता जाणवते, हजारो तरुण पर्याय अभावी अविवाहित राहत आहेत, समाजात विवाहाचं गणित बिघडलं आहे. पण तरीही ज्या मुली सून म्हणून घरात येतात त्यांना मानवी व्यक्ती न मानता “सोन्याची कोंबडी” समजलं जातं. माहेरहून पैसे, दागिने, वस्तू आणण्याची अपेक्षा केली जाते. ही अपेक्षा पूर्ण न झाल्यास मानसिक छळ, शारीरिक अत्याचार, आणि शेवटी आत्महत्येकडे ढकललं जातं.
Akola riot case : सुप्रीम कोर्टाचा पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचा आदेश
1961 चा हुंडा प्रतिबंधक कायदा हा भारतातील एक महत्त्वाचा टप्पा होता. त्यानंतर भारतीय दंडसंहिता, महिलांवरील घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा, आणि न्यायालयीन निर्णयांनी कायद्याचं जाळं मजबूत करण्याचा प्रयत्न केला. तरीही या घटनांवरून स्पष्ट होतं की अंमलबजावणीतील त्रुटी आजही गंभीर आहेत. एफआयआर नोंदणीपासून ते न्यायालयीन प्रक्रियेपर्यंत अनेकदा विलंब, दबाव, व पुराव्यांचा अभाव यामुळे आरोपी सुटतात.
कायद्यांपेक्षा मोठं आव्हान म्हणजे मानसिकता. शिक्षण, नोकऱ्या, आणि सार्वजनिक आयुष्यात महिलांनी उल्लेखनीय यश मिळवलं आहे. तरी घरगुती व्यवस्थेत त्यांचं स्थान दुय्यमच ठरतं. पुरुषी वर्चस्व, कुटुंबातील सत्ता-संतुलन आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या निकषांवर अजूनही स्त्रीची किंमत हुंड्याच्या आकड्याने मोजली जाते.
कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी, जलदगती न्यायालये व कडक शिक्षा. जनजागृती मोहिमा, हुंड्याला ‘गुन्हा’ म्हणून समाजमनात ठसवणं. सामाजिक-आर्थिक उपक्रम — मुलींच्या शिक्षणात, करिअरमध्ये गुंतवणूक वाढवणं, ज्यामुळे विवाह आर्थिक सौद्यात रूपांतर होणार नाही. या लढ्यात केवळ महिला नव्हे, तर पुरुषांनीही पुढाकार घेतला पाहिजे. अशा उपायोजनावर पक्षांवर शपथ चर्चा सुरू आहे.
Mahayuti Government : महसूल सेवक आक्रमक; बेमुदत कामबंद आंदोलनाची हाक
मयुरी, स्नेहा, वैष्णवी, निक्की ही केवळ नावं नाहीत, तर प्रत्येक घरातल्या एका स्वप्नाचा भंग आहेत. हुंड्याची ही कीड समाज पोखरत आहे. कायदे, सुधारणा, मोहिमा कितीही असल्या तरी मानसिकतेचा बदल हा खरा इलाज आहे. अन्यथा आपण अजून किती “मयुरी-स्नेहा” गमावणार हा प्रश्न कायम राहणार आहे.








