व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Eknath shinde : गुप्त दिल्ली दौऱ्यावर एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीची जोरदार...

Eknath shinde : गुप्त दिल्ली दौऱ्यावर एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीची जोरदार चर्चा

eknath-shinde-amit-shah-secret-delhi-meeting-maharashtra-politics : महाराष्ट्रातील माजी मंत्री ‘शिक्षणसम्राट’ सोबत असल्याचे उघड

Mumbai: राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील राजकीय हालचाली वेगाने घडत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुप्त दिल्ली दौऱ्याची चर्चा आता रंगू लागली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी कोणालाही सुगावा लागू न देता रविवारी दिल्ली गाठल्याचे वृत्त समोर आले आहे. या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

समोर आलेल्या वृत्तानुसार, एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची भेट रविवारी दिल्लीत पार पडली. विशेष म्हणजे या भेटीबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. शिंदे यांच्यासोबत कोणताही सहाय्यक नव्हता. एवढेच नव्हे तर या दौऱ्याची अधिकृत माहितीही कुठे देण्यात आली नव्हती.

सूत्रांच्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वीही एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी अमित शाह यांची भेट घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. मात्र वेळ न मिळाल्याने ती भेट होऊ शकली नाही. त्यानंतर शिंदे महाराष्ट्रात परतले. मात्र अमित शाह यांची भेट घेण्याचे प्रयत्न त्यांनी सुरूच ठेवले होते.

Lpg rule : `आता पीएनजी कनेक्शन घेतल्यानंतर एलपीजी कनेक्शन बंद करावे लागणार नाही

शनिवारी रात्री अमित शाह यांच्याकडून भेटीसाठी संदेश आल्यानंतर एकनाथ शिंदे रविवारी खासगी विमानाने दिल्लीला रवाना झाल्याचे सांगितले जाते. अमित शाह यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शिंदे दिल्लीहून थेट बंगळुरूला गेले आणि त्यानंतर ठाण्यात परतल्याची माहिती समोर आली आहे.

या भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. महायुतीमध्ये शिंदे गटाची कोंडी होत असल्याची भावना त्यांच्या मनात असल्याचे बोलले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून पक्षविस्ताराची रणनीती शिंदे आखत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र या मोहिमेसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून अद्याप स्पष्ट हिरवा कंदील मिळालेला नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, या गुप्त दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्रातील एक प्रभावी शिक्षणसम्राट आणि शिवसेनेचे माजी मंत्रीही उपस्थित असल्याचे वृत्त आहे. मध्यंतरी या नेत्याचे आणि शिंदे यांचे संबंध ताणले गेले होते. त्यामुळे अचानक दोघे एकत्र दिल्लीला गेल्याने राजकीय चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.

Kshitij thakur : हितेंद्र ठाकूरांची बहुजन विकास आघाडी शिवसेनेत विलीन होणार?

या संपूर्ण भेटीमागे नेमका राजकीय हेतू काय होता, महायुतीतील समीकरणांमध्ये कोणते बदल होणार आणि आगामी विधान परिषद निवडणुकीवर त्याचा काय परिणाम होणार, याकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!