व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home प्रशासकीय Election Commission of India : आमच्यासाठी ना कुणी सत्ताधारी, ना कुणी विरोधक...

Election Commission of India : आमच्यासाठी ना कुणी सत्ताधारी, ना कुणी विरोधक !

Election Commission appeals to political parties to report errors within 15 days : १५ दिवसांत त्रुटी सांगा, राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाचे आवाहन

New Delhi : देशभरातून निवडणूक आयोगावर विविध गंभीर आरोप करण्यात आल्यानंतर आज (१७ ऑगस्ट) आयोगाने पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू स्पष्ट केली. त्रुटी सादर करण्यासाठी दिलेल्या मुदतीचे १५ दिवस अजूनही शिल्लक आहेत. या कालावधीत आपल्या तक्रारी सादर करण्याचे आवाहन आयोगाने सर्व राजकीय पक्षांना केले आहे. आमच्यासाठी ना कुणी सत्ताधारी, अन् ना कुणी विरोधक. आमचा कारभार पारदर्शी असल्याचेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

उमेदवार निवडल्याच्या नंतर १५ दिवसांच्या आत उच्च न्यायालयात याचिका दाखल न केल्यास आणि मतचोरी सारखे चुकीचे शब्द वापरले जाऊन जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न केला गेल्यास तो संविधानाचा अपमान नाही का, असा प्रश्न आयोगाकडून उपस्थित करण्यात आला. मशीन रिडेबल मतदार यादीचा हा प्रश्न आहे. २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की आज केला जात असलेला प्रकार म्हणजे मतदारांच्या वैयक्तिक अधिकारांचा भंग आहे. काही दिवसांपूर्वी मतदारांचे फोटो त्यांच्या परवानगीशिवाय मिडियासमोर आणले गेले. हे सर्वार्थाने चुकीचे असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले.

Election Commission of India : आयोगाचे दरवाजे सर्व राजकीय पक्षांसाठी खुले !

कोणत्याही मतदाराचा व्हिडिओ आयोगाला सादर केला पाहिजे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत १ कोटी पेक्षा जास्त कर्माचारी १० लाखापेक्षा जास्त बीएलए, २० लाखापेक्षा जास्त उमेदवारांचे पोलिंग एजंट यांनी निवडणुकीचे काम केले. येवढ्या लोकांच्या समोर पारदर्शक प्रक्रियेत कोणताही मतदार मताची चोरी करू शकतो का, असाही प्रश्न आयोगाने उपस्थित केला. काही ठिकाणी डबल मतदानाचे आरोप करण्यात आले. पण पुरावा दिला गेला नाही. अशा पोकळ आरोपांना आयोग भीत नाही आणि मतदारही भिणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

error: Content is protected !!