व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Fertilizer retail centre : कृषी विभागाचा खतविक्री केंद्रांवर धडक तपासणी मोर्चा; दोन...

Fertilizer retail centre : कृषी विभागाचा खतविक्री केंद्रांवर धडक तपासणी मोर्चा; दोन केंद्रांना नोटीस

Agriculture Department launches surprise inspections at fertilizer sale centres; notices issued to two centres : डीएपी खताचा साठा असूनही शेतकऱ्यांना नकार; कृषी विभागाचा कारवाईचा इशारा

Khamgao खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खामगाव शहरात कृषी विभागाने अचानक तपासणी मोहीम राबवत दोन कृषी केंद्र चालकांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. डीएपी खताचा साठा उपलब्ध असूनही काही कृषी केंद्रांमध्ये शेतकऱ्यांना खत देण्यास नकार दिला जात असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. खामगावातील काही कृषी केंद्रांत डीएपी खत उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना ते दिले जात नसल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या.

यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर कृषी विभागाने तातडीने दखल घेत तपासणी मोहीम सुरू केली. १ जून रोजी कृषी विभागाचे गुणनियंत्रक अमोल बंड यांनी शहरातील सुमारे १० ते १२ कृषी केंद्रांची तपासणी केली.

Sindkhedraja Development : सिंदखेडराजाच्या आकाशात चार्टर विमानाच्या घिरट्या; ‘समृद्धी’ विकास केंद्रांबाबत उत्सुकता

तपासणीदरम्यान दोन कृषी केंद्र चालकांनी साठा उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना डीएपी खत देण्यास नकार दिल्याचे निदर्शनास आले. यानंतर संबंधितांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या. तसेच सर्व कृषी केंद्र चालकांना खतविक्री नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

Water crisis : पाणीटंचाईवरून अखेर आमदार अॅक्शन मोडमध्ये; प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश

अधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, साठा उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना खत न देणे, कृत्रिम टंचाई निर्माण करणे अथवा खतांचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यात खतांचा काळाबाजार सुरू असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर या कारवाईकडे महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. कृषी विभागाच्या या मोहिमेमुळे खत वितरण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सुरू असून, शेतकऱ्यांना वेळेत व नियमांनुसार खत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला आहे.

error: Content is protected !!