व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Girish mahajan : बुलढाणा भाजपच्या कलहात गिरीश महाजनांची एन्ट्री?

Girish mahajan : बुलढाणा भाजपच्या कलहात गिरीश महाजनांची एन्ट्री?

vijayraj shinde meets minister girish mahajan for interference in BJP’s internal politics : जिल्हाध्यक्षांनी भेट घेतल्याने पक्षांतर्गत राजकारण तापले

Buldhana जिल्हा भाजपमधील अंतर्गत कलह आणि वाढत्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी थेट जामनेर येथे जाऊन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. या भेटीमुळे जिल्ह्यातील पक्षांतर्गत राजकारणात मोठ्या बदलांचे संकेत मिळत असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
विजयराज शिंदे आणि गिरीश महाजन यांच्यातील या संवादाने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वरकरणी ही भेट सदिच्छा भेट वाटत असली, तरी प्रत्यक्षात जिल्हा भाजपमधील विस्कळीत झालेली घडी बसवण्यासाठी महाजन यांनी पुढाकार घेतल्याचे समजते. जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील वाढता दुरावा कमी करण्यासोबतच संघटनात्मक बांधणीवर या वेळी प्रदीर्घ खल झाला. विशेषतः ‘संकटमोचक’ म्हणून ओळख असलेले महाजन आता बुलढाण्यातील गटबाजी कशा प्रकारे मोडीत काढतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Legislative Council election : विधान परिषदेसाठी पडद्यामागची खेळी; बुलढाण्यात राजकीय तापमान वाढले

जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे यांच्या कार्यपद्धतीवर पक्षातील एक मोठा वर्ग साशंक असल्याची माहिती समोर येत आहे. संघटनात्मक कामात त्यांची सक्रियता कमी असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. नेत्यांमधील या संवादहीनतेचा फटका पक्षाला बसू नये, यासाठीच विजयराज शिंदे यांनी थेट महाजनांकडे धाव घेतल्याचे बोलले जाते. महाजन यांनी यापूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यांतील वादावर पडदा टाकून संघटना मजबूत करण्यात यश मिळवले आहे, तोच ‘फॉर्म्युला’ आता बुलढाण्यात राबवला जाण्याची शक्यता आहे.

 

Malkapur municipal council : नगरपरिषद ‘अकार्यक्षम’; प्रहारकडून घागर पुजून श्राद्ध आंदोलन

जामनेर येथील या भेटीनंतर जिल्ह्यातील भाजपमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत. महाजन यांचा वाढता हस्तक्षेप स्थानिक नेत्यांच्या कार्यपद्धतीवर काय परिणाम करतो आणि कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करण्यात त्यांना कितपत यश येते, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, या एका भेटीने जिल्ह्यातील सत्तासमीकरणांची समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

error: Content is protected !!