व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Legislative election : बाजोरियांची नाराजी दूर होईल, राणा दाम्पत्य साथ सोडणार नाही

Legislative election : बाजोरियांची नाराजी दूर होईल, राणा दाम्पत्य साथ सोडणार नाही

Internal rifts within Mahayuti come to the fore after Pravin Pote’s candidature : बावनकुळेंना विश्वास, प्रवीण पोटे यांच्या उमेदवारीनंतर महायुतीत अंतर्गत वाद

Amravati विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर राज्याचे महसूलमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. अमरावती मतदारसंघातील महायुतीचा विजय हा आतापर्यंतच्या सर्व विजयांपेक्षा मोठा असेल, असा दावा त्यांनी केला.

माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीचे उमेदवार म्हणून प्रवीण पोटे निवडणूक मैदानात आहेत. कोरोना काळात त्यांनी मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली. तसेच मतदारसंघात सातत्याने जनसंपर्क ठेवून विविध विकासकामे केली आहेत. त्यामुळे त्यांना विक्रमी मताधिक्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Mlc election : नाशिक विधान परिषद निवडणुकीत ठाकरे गटाची अनपेक्षित माघार

माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या भूमिकेबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले की, दोघेही प्रगल्भ नेते आहेत. काही स्थानिक मतभेद असले तरी ते महायुतीसोबतच राहतील.

शिवसेनेचे विप्लव बाजोरिया यांच्या उमेदवारीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, अद्याप त्यांनी अर्ज दाखल केलेला नाही. काही नाराजीमुळे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तरी त्यांची नाराजी ४ जूनपूर्वी दूर होईल, असा विश्वास आहे.

Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीत लवकरच संघटनात्मक पुनर्रचना; अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार

दरम्यान, या निवडणुकीत आतापर्यंत पाच उमेदवार रिंगणात उतरले आहेत. भाजपकडून प्रवीण पोटे, वंचित बहुजन आघाडीकडून निलेश विश्वकर्मा, तर अपक्ष म्हणून विप्लव बाजोरिया आणि प्रशांत महल्ले यांनी सोमवारी नामांकन अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांनी यापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा काँग्रेसचा बी-फॉर्म निवडणूक यंत्रणेकडे सादर झाल्याने ते आता काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ठरले आहेत.

राज्यातील जागावाटपाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी एकमताने निर्णय घेतला आहे. त्यानुसार भाजप ११, शिवसेना (शिंदे गट) ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २ जागांवर निवडणूक लढवत आहे. महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच महायुतीत कोणतेही मतभेद नसून स्थानिक राजकीय परिस्थिती आणि पक्षांची ताकद लक्षात घेऊन जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले

error: Content is protected !!