Organizational restructuring in Vanchit Bahujan Aghadi soon; election to be held for the president’s post : समित्यांसाठीही अंतर्गत निवडणुका होणार, केंद्रीय निवडणूक समितीचा निर्णय
Akola वंचित बहुजन आघाडी (VBA) महाराष्ट्र राज्यातील संघटनात्मक पुनर्रचनेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलणार असून, त्याअंतर्गत राज्याध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य समितीच्या सदस्यांची निवड मतपत्रिकेद्वारे करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य अॅड. प्रियदर्शी तेलंग यांनी दिली.
पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीवर (CEC) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य समितीच्या सदस्यांच्या निवडीसाठी संघटनात्मक निवडणुका घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या निवडणुकांद्वारे पक्षाच्या संघटनात्मक रचनेला अधिक लोकशाही पद्धतीने बळकटी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या निवडणुकीत केवळ वंचित बहुजन आघाडीचे नोंदणीकृत सदस्यच मतदान करू शकणार आहेत. त्यामुळे पक्षाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी सदस्य म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाइन सदस्य नोंदणीची सुविधा उपलब्ध असून इच्छुकांनी पक्षाच्या अधिकृत सदस्य नोंदणी पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Tukaram mundhe : भ्रामक जाहिरातींना आळा घालण्यासाठी तुकाराम मुंढे आक्रमक !
तसेच ऑफलाइन सदस्य नोंदणी प्रक्रियेसंदर्भात पक्षाकडून लवकरच स्वतंत्र परिपत्रक जारी करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली. अंतर्गत निवडणुकांचे संभाव्य वेळापत्रक, उमेदवारी प्रक्रिया, मतदानाची पद्धत आणि इतर आवश्यक बाबी केंद्रीय निवडणूक समितीकडून लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.
Ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थीं वगळले नसल्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा
दरम्यान, अंतर्गत निवडणुकांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर होईपर्यंत वंचित बहुजन आघाडीची विद्यमान महाराष्ट्र राज्य समिती कार्यरत राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे राज्यातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होण्यास मदत होईल, तसेच कार्यकर्त्यांना नेतृत्व निवडीच्या प्रक्रियेत थेट सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.








