Congress condemns Agriculture Minister for making absurd statements about farmers : शेतकऱ्यांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या कोकाटेंचा तीव्र निषेध
Chikhali “कृषीमंत्री पद म्हणजे ओसाड गावाची पाटीलकी”, “ढेकळ्यांचे पंचनामे करायचे का?”, “भिकारीही एक रुपया घेत नाही, पण आम्ही एक रुपयात पीक विमा दिला”, “कर्जमाफी झाली की तुम्ही साखरपुडे करता” – अशी आक्षेपार्ह, बेताल आणि शेतकरीविरोधी विधाने करणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे Rahul Bondre यांनी आज चिखलीत केली.
राहुल बोंद्रे म्हणाले की, “दर तीन तासांत एक शेतकरी आत्महत्या करतोय आणि राज्याचे कृषीमंत्री मात्र विधानसभेत रमी खेळण्यात व्यस्त आहेत. ही कोणती राजकीय नैतिकता आहे? शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या अशा मंत्र्याला पदावर राहण्याचा काहीही नैतिक अधिकार उरलेला नाही. कोकाटेंनी तातडीने राजीनामा द्यावा.”
काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमुखीपणे कोकाटेंच्या वक्तव्यांचा निषेध करत, शेतकरीविरोधी मानसिकतेला वाचा फोडली. “हे सरकार शेतकऱ्यांच्या वेदनांपासून कोसो दूर आहे, आणि त्याचे प्रत्यक्ष उदाहरण कृषिमंत्र्यांच्या असंवेदनशीलतेतून दिसते,” अशी टीका यावेळी करण्यात आली.
Sharad Pawar NCP : तहसीलपुढेच ‘रमी’चा डाव; जळगाव जामोदमध्ये अभिनव आंदोलन
या वेळी तालुकाध्यक्ष रामभाऊ जाधव, राहुल सवडतकर, अतहरोद्दीन काझी, दीपक देशमाने, डॉ. मोहंमद इसरार, कुणाल बोंद्रे, प्रा. नीलेश गावंडे, प्रा. राजू गवई, सभापती डॉ. संतोष वानखेडे, रिक्की काकडे, श्याम पठाडे, डॉ. सत्येंद्र भुसारी, अशोक पडघान, किशोर कदम, ज्ञानेश्वर सुरूशे, राजू रज्जाक यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.