Ministers wicket : कोकाटेंनंतर आता आणखी एका मंत्र्याची ‘विकेट’ पडणार?

Rohit Pawar’s direct name-calling creates a stir in politics : रोहित पवारांनी थेट नाव घेतल्याने राजकारणात खळबळ

Mumbai: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांच्याकडील क्रीडा खात्याचा कारभार काढून घेतल्यानंतर ते सध्या बिनखात्याचे मंत्री झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे केलेल्या शिफारशीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून, कोकाटे यांच्यावर अटक वॉरंटही जारी झाल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. अशातच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आणखी एका बड्या मंत्र्याचं नाव थेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

माणिकराव कोकाटे सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. मात्र, त्यांच्याविरोधातील कायदेशीर कारवाई आणि मंत्रिपदावरून दूर करण्यात आल्यानंतर सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून सरकारवर जोरदार टीका करत, “आम्ही आणखी एका मंत्र्याची विकेट पडण्याची वाट पाहात आहोत,” असं विधान केलं आहे.

Dhananjay Munde : दिल्लीतील भेटीनंतरही धनंजय मुंडेंचं मंत्रिपदाचं स्वप्न अधुरंच?

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मंत्री कोकाटे यांचा राजीनामा म्हणजे निसटण्याचे सर्व मार्ग संपल्याने नाईलाजाने घेतलेला निर्णय आहे. नैतिकतेच्या आधारावर कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा ठोठावली तेव्हाच त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला हवा होता किंवा सरकारने तरी तत्काळ त्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. तसं झालं असतं तर किमान कायद्याचा सन्मान राखला गेला असता आणि कायदा व न्याय सर्वांसाठी समान आहेत, असा सकारात्मक संदेश समाजात गेला असता, अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली आहे.

Pragya Rajiv Satav : काँग्रेसला मोठा धक्का; आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांचा राजीनामा,

पुढे बोलताना रोहित पवार यांनी सरकारवर थेट बोट ठेवत, या प्रकरणातून अनेकांनी धडा घ्यायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र, त्याच वेळी त्यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचं नाव घेत, “आम्ही मात्र मंत्री शिरसाट यांच्याही विकेटची वाट पाहात आहोत,” असं विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. रोहित पवार यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याचं चित्र आहे.

Kokate hit wicket : कोकाटे ही ‘हिट विकेट’, स्वतःच खड्ड्यात उडी मारली; योग्य वेळी केस बाहेर आली !

दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्यावर खोटी कागदपत्रे सादर करून नाशिकमधील मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील शासकीय सदनिका बेकायदेशीररीत्या मिळवल्याचा आरोप आहे. हे प्रकरण 1995 सालचे असून, या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने कोकाटे यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. हीच शिक्षा सत्र न्यायालयानेही कायम ठेवली आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोन किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीची शिक्षा झाल्यास लोकप्रतिनिधीपद रद्द होतं, याच तरतुदीनुसार कोकाटे यांच्याकडील खाते काढून घेण्यात आलं आहे.

कोकाटे यांच्यानंतर आता रोहित पवार यांनी थेट आणखी एका मंत्र्याचं नाव घेतल्याने मंत्रिमंडळात पुढे कोणावर कारवाई होते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

__