mahayuti-meeting-arjun-khotkar-meet-sunetra-pawar-mlc-election-2026 : अर्जुन खोतकरांची सुनेत्रा पवारांशी भेट, मुलासाठी उमेदवारीची मागणी?
Mumbai : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. जागावाटपावरून सुरू असलेल्या तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तातडीची बैठक बोलावली असून मुंबईत दिवसभर महत्त्वाच्या राजकीय हालचाली घडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिंदे सेनेचे नेते आणि मराठवाड्यातील प्रभावी आमदार अर्जुन खोतकर यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देवगिरी बंगल्यावर भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले असून खोतकर आपल्या मुलगा अभिमन्यू खोतकर याला विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेली महायुतीची बैठक आज सायंकाळी वर्षा निवासस्थानी होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. विधान परिषद निवडणुकीतील जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
Lpg rule : `आता पीएनजी कनेक्शन घेतल्यानंतर एलपीजी कनेक्शन बंद करावे लागणार नाही
सध्या पुणे मतदारसंघावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. तर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर मतदारसंघावरून शिवसेना आणि भाजपमध्ये धुसफूस वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार, यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अर्जुन खोतकर यांच्या भेटीनंतर सुरुवातीला त्यांच्या कन्या दर्शना खोतकर-झोल यांचे नाव चर्चेत आले होते. मात्र माध्यमांशी बोलताना खोतकर यांनी स्पष्ट केले की, विधान परिषदेसाठी त्यांचा मुलगा अभिमन्यू खोतकर इच्छुक आहे. उमेदवारीचा अंतिम निर्णय हा पक्ष नेतृत्व घेईल आणि यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय करतील, असेही त्यांनी सांगितले.
तसेच, अभिमन्यू खोतकर याला उमेदवारी मिळावी अशी मागणी आपण केली असल्याचे खोतकर यांनी मान्य केले. मात्र सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा राजकीय पाठिंबा मागितलेला नसून कामानिमित्त ही भेट घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Kshitij thakur : हितेंद्र ठाकूरांची बहुजन विकास आघाडी शिवसेनेत विलीन होणार?
छत्रपती संभाजीनगरनंतर आता मराठवाड्यातील आणखी एका जागेसाठी शिंदे सेना आक्रमक झाल्याचे या घडामोडींमधून दिसून येत आहे. त्यामुळे आजच्या महायुती बैठकीत जागावाटपाचा तिढा सुटणार का, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








