व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या Mpsc exam scam : तुम्हीच मान्य केले, मागच्या कार्यकाळात घोळ झाला, रोहित...

Mpsc exam scam : तुम्हीच मान्य केले, मागच्या कार्यकाळात घोळ झाला, रोहित पवार, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

mpsc-exam-scam-rohit-pawar-vijay-wadettiwar-attack-chairman-resignation-demand : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर दोन्ही नेते ठाम

Nagpur : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षेतील कथित घोटाळ्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी MPSCचे अध्यक्ष भीमनवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘माझ्या कार्यकाळात घोळ झाला नाही, तर त्याआधीच्या काळात झाला,’ असे अध्यक्ष सांगत असतील, तर MPSCच्या परीक्षांमध्ये घोळ झाल्याचे त्यांनीच मान्य केले आहे. मग ज्या काळात हा घोळ झाला, त्या काळातील संबंधितांची नावे अध्यक्षांनी जाहीर करावीत, असे थेट आव्हान दोन्ही नेत्यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना दिले.

स्पर्धा परीक्षेतील कथित गैरप्रकार समोर आल्यानंतर अन्न व औषध निरीक्षक पदाची परीक्षा रद्द करण्यात आली असून पेपरफुटीप्रकरणी काही जणांना अटकही करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १० हजार विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसचे नेतेही सहभागी झाले होते. यावेळी MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याची एकमुखी मागणी करण्यात आली.

Nitesh Rane : मुस्लिमांच्या कार्यक्रमात हिंदूंना परवानगी नसते मग गरब्यात मुस्लिमांना का?

दरम्यान, MPSC अध्यक्ष भीमनवार यांनी रद्द करण्यात आलेल्या परीक्षेशी आणि त्यातील कथित घोळाशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. आपण पदभार स्वीकारण्यापूर्वी ही परीक्षा घेण्यात आली होती, मग आपल्या राजीनाम्याची मागणी का केली जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. अध्यक्षांच्या याच भूमिकेचा आधार घेत रोहित पवार आणि विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. ‘माझ्या कार्यकाळातील हा घोळ नाही, तो यापूर्वी झाला आहे,’ असे अध्यक्षांनीच स्पष्ट केल्याने आता ज्या कार्यकाळात हे गैरप्रकार झाले, त्या काळातील संबंधितांची नावे त्यांनी जाहीर करावीत, अशी मागणी दोन्ही नेत्यांनी केली.

Agriculture zone : पालकमंत्र्यांचा हुडकेश्वर – नरसाळा अजूनही ‘कृषी झोन’मध्येच

MPSCच्या कारभारावरून विद्यार्थ्यांचा विश्वास उडाला असून अध्यक्षांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, असा पुनरुच्चार आमदार रोहित पवार यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात स्वतः पुढाकार घेऊन MPSC अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा; अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. MPSC अध्यक्षांनी स्पष्टीकरण दिले असले तरी या मुद्द्यावर विरोधक आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे MPSCच्या कारभारावरून सुरू झालेला हा वाद आगामी काळात आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!