A major Congress organisation joins the BJP : या संघटनेचा मोठा निर्णय, राजकीय वर्तुळात व्यक्त होतेय आश्चर्य
Mumbai भारतीय जनता पक्षाने नव्या वर्षाच्या सुरुवातीला मोठा राजकीय ‘जॅकपॉट’ मारला आहे. देशातील सर्वात मोठ्या कामगार संघटनांपैकी एक असलेल्या अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्रासह देशभरातील या संघटनेचे लाखो सदस्य आता भाजपच्या छत्राखाली आले आहेत. या प्रवेशामुळे भाजपला कामगार वर्गात मोठे बळ मिळणार असून आगामी निवडणुकांमध्ये त्याचा परिणाम दिसून येईल.
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस ही देशभरातील सफाई कामगारांची जुनी आणि प्रभावी संघटना मानली जाते. या संघटनेचे कार्यकर्ते विविध राज्यांमध्ये स्थानिक पातळीवर सक्रिय आहेत. त्यांच्या प्रश्नांसाठी, हक्कांसाठी आणि सामाजिक न्यायासाठी ही संघटना सातत्याने लढा देत आली आहे. त्यामुळे या संघटनेचा भाजपमध्ये प्रवेश झाल्याने भाजप आता प्रचंड मोठी शक्ती म्हणून उदयास येत आहे.
Municipal elections : भाजपच्या चुकीमुळे नाहक त्रास नको, लोकशाही मार्गानेच उत्तर देऊ !
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदभाई परमार असून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला. परमार यांच्यासह अनेक पदाधिका-यांनीही यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा भाजपच्या ढोबमणे सभागृहातील मुख्य कार्यालयात संपन्न झाला.
Navneet Rana : ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला, त्यांचा बदला घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
या प्रवेशामुळे महाराष्ट्रातही राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या महानगरांमध्ये सफाई कामगारांची संख्या मोठी आहे. या संघटनेचे देशभरात १५ राज्यात दीड लाखाच्यावर देशभरात तर महाराष्ट्रात सुमारे ५० हजार पदाधिकारी वेगवेगळ्या जिल्ह्यात काम करत असतात. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस जी सफाई कामगार क्षेत्रात प्रमुख संघटना होती. त्यांच्या संघटित शक्तीचा परिणाम स्थानिक निवडणुकांवर होतो.
याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, “इतर पक्ष केवळ मतं मागता मात्र आम्ही त्यांच्या पाठीशी असतो. त्यामुळे परमार यांच्या नेतृत्वात संपूर्ण संघटनेने भाजपात प्रवेश केला आहे.”








