व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Municipal election : परिवार पुन्हा एकत्र येतोय’अजित पवारांचे सूचक वक्तव्य

Municipal election : परिवार पुन्हा एकत्र येतोय’अजित पवारांचे सूचक वक्तव्य

Both nationalist parties an alliance called clock and trumpet together : पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी ‘घड्याळ आणि तुतारी एकत्र’

Pune: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांमध्ये युती आणि आघाडीचे राजकारण रंगताना दिसत आहे. मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली असून, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीने काँग्रेससोबत हातमिळवणी केली आहे. त्याचदरम्यान पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील जवळीक चर्चेचा विषय ठरत आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांची अधिकृत आघाडी जाहीर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक आणि महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “परिवार पुन्हा एकत्र येण्याचं काम होत आहे,” असं म्हणत त्यांनी राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फोडलं आहे.

Amravati Municipal Corporation Elections : २५ जागांची मागणी फेटाळली, भाजप–शिवसेना युती तुटली

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने घड्याळ आणि तुतारी हे दोन्ही चिन्ह एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जात असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. “राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे घड्याळ आणि तुतारी एकत्र येत आहेत. बऱ्याच जणांच्या मनात ही भावना होती, ती आज प्रत्यक्षात येताना दिसते आहे,” असं ते म्हणाले. या वक्तव्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीतील अंतर्गत समीकरणांबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणूक लढवताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार असल्याची घोषणा करताना अजित पवार म्हणाले की, “आपल्या विचारांचे काही खासदार दिल्लीत आहेत. त्यांच्यामार्फत तिथं आवाज उठवता येईल. त्यामुळे कुठलीही अडचण नाही.” त्यांच्या या वक्तव्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरती ही आघाडी असली, तरी त्याचे दूरगामी राजकीय संकेत दिले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Amravati Municipal Corporation Elections : काँग्रेस-शिवसेनेची संयुक्त बैठक, या मुद्यावर एकमत

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील बारामती येथे उद्योगपती गौतम अदाणी यांच्या हस्ते ‘शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या केंद्राचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार कुटुंबातील सर्व प्रमुख नेते एकाच मंचावर एकत्र आले. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासह कुटुंबातील अन्य नेत्यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मंचावर संवाद झाल्याचंही पाहायला मिळालं, ज्यामुळे राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीच्या भविष्यातील एकजुटीबाबत चर्चांना आणखी बळ मिळालं आहे.

error: Content is protected !!