व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Nana Patole : सरकारला जाग का येत नाही? दुष्काळाच्या मागणीत राजकारण कुठे...

Nana Patole : सरकारला जाग का येत नाही? दुष्काळाच्या मागणीत राजकारण कुठे आले?

Congress leader Nana Patole attacks on Mahayuti government over the drought situation : नाना पटोलेंचा सरकारला सवाल, महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल

Nagpur राज्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यात सर्वत्र भीषण दुष्काळ असूनही सरकारला तो दिसत नाही. दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली की विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप केला जातो. दुष्काळाच्या मागणीत राजकारण कुठे आले? या सरकारला जाग का येत नाही आणि सरकार आणखी किती लोकांच्या टाळूवरचे लोणी खाणार​ असा संतप्त सवाल पटोले यांनी केला आहे.

नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, मराठवाडा आणि विदर्भात परिस्थिती अत्यंत बिकट असून शेतातील उभी पिके करपून गेली आहेत. विरोधक म्हणून या गंभीर समस्येकडे सरकारचे लक्ष वेधणे आणि बळीराजासाठी मदत मागणे ही आमची जबाबदारी आहे. मात्र, विरोधकांनी मागणी किंवा आंदोलन केले की सरसकट त्यांच्यावर राजकारणाचा ठपका ठेवणे ही सरकारची सवयच झाली आहे.

Sharad Pawar : शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र, ‘राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा’

कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही आणि एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत देणार, अशा केवळ तोंडी घोषणा केल्या जात आहेत, पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाहीत, हेच खरे वास्तव आहे. या मदतीसाठी हे सरकार आणखी किती दिवस वाट बघायला लावणार, असा सवाल करत पटोले यांनी राज्य सरकारच्या धोरणावर कडक शब्दांत ताशेरे ओढले.

error: Content is protected !!