व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण NEET paper leak : मनोज जरांगे दिल्लीत, सरकारला झुकवण्यासाठी जंतरमंतरवर; आंदोलन करणाऱ्यांना...

NEET paper leak : मनोज जरांगे दिल्लीत, सरकारला झुकवण्यासाठी जंतरमंतरवर; आंदोलन करणाऱ्यांना दिला सल्ला?

Manoj jarange in Delhi to support students protest : राजकारण बाजूला ठेवून लढण्याचे केले आवाहन

New delhi नीट (NEET) पेपर फुटीच्या विरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी थेट पाठिंबा दर्शवला असून, आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजित दीपके आणि विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांनी केंद्र सरकारला थेट इशारा दिला आहे.

आंदोलनाचा मोठा अनुभव पाठीशी असलेल्या जरांगे पाटलांच्या या एन्ट्रीमुळे राष्ट्रीय स्तरावर या आंदोलनाचे पडसाद उमटू लागले आहेत. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीमार केला तर भाजपच्या एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा कडक इशारा देत त्यांनी, हे कोणतेही राजकीय आंदोलन नसून आपल्या लेकरांच्या भविष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे पक्ष बाजूला ठेवून सर्वांनी या लढ्यात उतरावे, असे आवाहन केले.

NEET paper leak: विद्यार्थ्यांचे आंदोलन भडकलेले असतानाच शरद पवार पंतप्रधान मोदींना भेटले!

जनतेने निवडून दिलेल्या सरकारला सत्तेचा माज चढला असून त्याची जाणीव करून देण्यासाठीच आपण दिल्लीत आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आंदोलन दडपले जाऊ नये म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांशि चर्चा करून मोलाचा ‘कानमंत्र’ दिला. शांततापूर्ण मार्गाने आपले आंदोलन सुरू ठेवा, कोणीही जंतरमंतर सोडू नका आणि उगाच संसदेवर जाण्याचे धाडस करू नका, असे सांगत त्यांनी सरकार आंदोलनावर दडपशाही करण्यासाठी संधी शोधत असल्याचा इशारा दिला. हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाचा नसून देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेला आहे, ज्याचा फटका सर्वपक्षीय नेत्यांच्या मुलांनाही बसला आहे, असे त्यांनी नमूद केले.

NEET paper leak: NEET पेपर फुटीचा दिल्लीत भडका! विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार

महाराष्ट्रात आरक्षणासाठी आक्रमक आंदोलने करून सरकारला झुकवणारे आणि मुंबई ठप्प पाडणारे मनोज जरांगे पाटील आता दिल्लीच्या दरबारात विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहिल्याने केंद्र सरकारवरील राजकीय दबाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

error: Content is protected !!