व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Operation Tiger : उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही; पक्षांतराच्या चर्चांवर सिद्धार्थ खरातांचा...

Operation Tiger : उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही; पक्षांतराच्या चर्चांवर सिद्धार्थ खरातांचा पूर्णविराम

MLA Siddharth Kharat puts an end to speculations about switching parties : ‘ऑपरेशन 3.0’च्या चर्चांदरम्यान आमदार सिद्धार्थ खरातांची स्पष्ट भूमिका; मतदारांचा विश्वासघात करणार नाही

Mehkar राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन 3.0’च्या चर्चांना वेग आला असताना मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन पक्षांतराच्या सर्व चर्चांना स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला. आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच कार्यरत राहणार असून, मतदारांचा विश्वासघात करणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

“निष्ठा आणि विश्वास विकत मिळत नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मतदारांशी कोणतीही तडजोड करणार नाही,” असे सांगत त्यांनी पक्षांतराच्या अफवा फेटाळून लावल्या. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर आपला पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खरात म्हणाले की, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील 20 पैकी एकही आमदार कुठेही जाणार नाही. सर्व आमदार पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखाली एकजुटीने उभे असून, कोणत्याही परिस्थितीत पक्षाशी किंवा नेतृत्वाशी बेईमानी केली जाणार नाही.

Sachin Ahir : सचिन अहिर प्रकरणात शिंदेंची खेळी पुन्हा यशस्वी?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘हमें याद रखना’ या पोस्टबाबतही त्यांनी खुलासा केला. 22 जून रोजी झालेल्या बैठकीनंतर आमदार कैलास पाटील आणि आमदार नितीन देशमुख यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करण्यात आला होता. संकटाच्या काळात पक्षाशी निष्ठावान राहिलेल्या सहकाऱ्यांची आठवण ठेवावी, एवढाच त्या पोस्टचा उद्देश होता. मात्र, काहींनी त्याचा चुकीचा अर्थ काढत त्याला पक्षांतराशी जोडण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी सांगितले.

Sachin ahir : मोठा राजकीय धक्का! सचिन अहिरांचा शिंदे गटाकडून विधानपरिषद उपसभापतीपदासाठी अर्ज

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याशी कथित जवळिकीबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले. सामाजिक कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या भेटीगाठींचा राजकीय भूमिकेशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, ‘मातोश्री’वर भेट मिळत नसल्याच्या चर्चाही त्यांनी फेटाळून लावत, गरज भासल्यास उद्धव ठाकरे यांच्याशी थेट संपर्क होत असल्याचे सांगितले. यावेळी मेहकर नगराध्यक्ष किशोर गारोळे, युवा सेना तालुकाध्यक्ष ॲड. आकाश घोडे, संजय वडतकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!