व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Paratwada Sexual exploitation case : आपसांत भांडू नका, पुरावे असतील तर पोलिसांना...

Paratwada Sexual exploitation case : आपसांत भांडू नका, पुरावे असतील तर पोलिसांना द्या, बावनकुळे संतापले

Chandrashekhar bawankule warns navneet rana, pyare khan, anil bonde not to speak without proof : परतवाडा व्हिडिओ प्रकरणात राणा–बोंडे–प्यारे खान यांचे टोचले कान

Amravati परतवाडा येथील गाजत असलेल्या ‘व्हिडीओ कांड’ प्रकरणावरून जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असतानाच, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी आक्रमक भूमिका घेतली. “पुरावे असतील तर ते थेट पोलिसांकडे द्या; माध्यमांसमोर अप्रमाणित दावे करून समाजात तेढ निर्माण करू नका,” अशा शब्दांत त्यांनी माजी खासदार नवनीत राणा, खासदार डॉ. अनिल बोंडे आणि राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांना जाहीर तंबी दिली.

गेल्या काही दिवसांत या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेणारे डॉ. अनिल बोंडे हे बावनकुळे यांच्या दौऱ्यात अनुपस्थित राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. प्रकरणात आतापर्यंत १८ व्हिडीओ आणि ८ पीडिता निष्पन्न झाल्याची अधिकृत माहिती असताना, बोंडे यांनी १८० मुली आणि ३५० व्हिडीओंचा दावा केला होता. यावर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दांत आक्षेप घेत, “अधिकृत माहिती येईपर्यंत आकडेवारीची फेकाफेक टाळावी,” असे सांगितले.

Mahayuti Government : महागाई वाढली मानधन वाढले, प्रवास भत्ताही वाढला!

त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन तपासाचा आढावा घेतला. यावेळी आमदार प्रवीण तायडे उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, “कोणाकडेही ठोस पुरावे असतील तर ते तत्काळ एसआयटीकडे सुपूर्द करावेत. माध्यमांनीही केवळ पोलिसांकडून मिळालेली अधिकृत माहितीच प्रसारित करावी.” दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाचा आढावा घेतला असून, “आरोपी देशात कुठेही असला तरी त्याला शोधून काढले जाईल,” अशी ग्वाही दिली आहे.

नागपूरहून १५ वर्षीय पीडिता बयान नोंदवण्यासाठी आली असून, तपास यंत्रणा अत्यंत सतर्कतेने काम करत आहे. व्हायरल व्हिडीओ रोखून परिस्थिती नियंत्रणात ठेवल्याबद्दल बावनकुळे यांनी अमरावती ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांचे कौतुक केले. आता या प्रकरणातील फॉरेन्सिक अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bjp internal conflict : भाजपमध्ये ‘निष्ठावंत विरुद्ध आयात नेते’ संघर्ष भडकला

“कोणत्याही लोकप्रतिनिधीने पोलिस किंवा एसआयटीचा तपास भरकटवू नये. माध्यमांनीही संवेदनशीलतेने वार्तांकन करावे. तपास योग्य दिशेने सुरू असून ग्रामीण पोलिसांचे काम कौतुकास्पद आहे,” असेही बावनकुळे यांनी नमूद केले.

error: Content is protected !!