व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Prafulla Gudadhe : भाजपनेच २०१९ मध्ये बावनकुळेंचे शटर पाडले; आता ते इतरांना...

Prafulla Gudadhe : भाजपनेच २०१९ मध्ये बावनकुळेंचे शटर पाडले; आता ते इतरांना दुकानदारी शिकवत आहेत!

The BJP itself shut down Bawankule’s political shop in 2019; now he is lecturing others on political shopkeeping : मीच पुढचा मुख्यमंत्री’ म्हणत बावनकुळे स्वप्नरंजनात

 

Nagpur : नागपुरात भाजपचे दुकान माझ्या वडिलांनी सुरू केले होते, हे विसरू नका. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला सल्ला देण्यापेक्षा स्वतःच्या दुकानाची चिंता करावी. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते ऊर्जामंत्री आणि पालकमंत्री असताना भाजपनेच त्यांचे दुकान बंद केले होते, अशा टोकदार शब्दांत नागपूर काँग्रेसचे नवनियुक्त शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांनी भाजपचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर थेट हल्ला चढवला.

पदभार स्वीकारताच गुडधे यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
बावनकुळेंनी काँग्रेसवर केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेताना गुडधे म्हणाले, भाजपमध्ये नेहमीच बहुजन आणि ओबीसी नेत्यांची गळचेपी झाली आहे. गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, महादेवराव शिवणकर, अरुण अडसड यांसारख्या ज्या ओबीसी नेत्यांनी पक्ष वाढवला, त्यांनाच भाजपने नंतर बाजूला सारून संपवले. ऊर्जामंत्री असताना भाजपने त्यांचे तिकीट कापले होते. त्यावेळी बावनकुळे हेही नैराश्यात गेले होते. नंतर मागच्या दाराने पक्षात प्रवेश मिळवला.

Sudhir mungantiwar : संकटाशी झुंजणाऱ्या ३ वर्षीय चिमुकलीसाठी मुनगंटीवार ठरले आधारवड; एम्समध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

आता ते स्वतःच पुढचा मुख्यमंत्री मीच असणार असा दावा करत फिरत आहेत, पण भाजप त्यांचे महसूल खात्याचे दुकान किती दिवस सुरू ठेवणार याचीच आम्हाला चिंता आहे. भाजप हे एक ‘अनैतिक दुकान’ असल्याने उद्या ते जेलमध्ये जातील की काय, अशी भीती आता वाटू लागली असल्याचे गुडधे म्हणाले.

बावनकुळे प्रदेश अध्यक्ष असताना भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा असल्याचे सांगत होते. मात्र त्यांच्याच महसूल खात्यात सर्वाधिक अनियमिता सुरु आहे. रोज कोणतरी पोलिसांच्या जाळ्यात अडकत आहे. हिट व्हेव सुरु असताना आणि शेकडे लोकं उन्हाने मेले असताना पालकमंत्री या नात्याने त्यांनी काहीच उपाय योजना केल्या नाहीत. त्यांनी राजकारणावर कमी बोलावे आणि कामकाजाकडे लक्ष द्यावे असा सल्लाही गुडधे यांनी दिला.या वेळी संदेश सिंगलकार, विजय सराडकर, बंटी शेळके, नयना झाडे, बंडोपन्त टेम्भूरकर, सुरेश जाग्याशी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!