व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Rahul Gandhi: राहुल गांधींच्या ‘त्या’ ट्विटमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या ‘त्या’ ट्विटमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Rahul Gandhi’s X post on tribal students protest in Maharashtra targets cm devendra Fadnavis : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजप-काँग्रेस आमनेसामने

Nagpur पुण्यात गेल्या २० दिवसांपासून प्रलंबित शिष्यवृत्ती आणि वसतिगृहांच्या विविध समस्यांवरून उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे पडसाद आता राज्याच्या राजकारणात उमटू लागले आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याप्रकरणी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने सोशल मीडियावर पोस्ट करत राज्य सरकारच्या कारभारावर निशाणा साधला. राहुल गांधींच्या या हस्तक्षेपानंतर महाराष्ट्रात काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार राजकीय कलगीतुरा रंगला असून आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली आहे.

पुण्यातील या आंदोलनाकडे राज्य शासनाने सुरुवातीला दुर्लक्ष केल्याचा आरोप करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला. राज्य सरकारकडे कुंभमेळ्यासारख्या आयोजनांवर उधळपट्टी करण्यासाठी कोट्यवधी रुपये आहेत, परंतु विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि शिष्यवृत्तीसाठी पैसे नाहीत, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
दुसरीकडे, भाजपचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींचे दावे फेटाळून लावले आहेत. राहुल गांधी यांना वस्तुस्थितीची पूर्ण माहिती नाही. जर त्यांना खरी परिस्थिती माहिती असती, तर त्यांनी असे ट्विट केले नसते, असा पलटवार त्यांनी केला.

Ladki bahin yojana : लाडक्या बहिणीसाठी पुन्हा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला!

या राजकीय गदारोळात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या भूमिकेचे समर्थन केले. राहुल गांधी हे देशाचे विरोधी पक्षनेते आहेत. राज्यातील गंभीर समस्यांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणे हे त्यांचे कर्तव्यच आहे. राज्य सरकारने याकडे राजकीय चष्म्यातून न पाहता गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. केवळ आरोप-प्रत्यारोप करून मूळ मुद्द्याला बगल देऊ नये, असा सल्ला राऊत यांनी दिला.

शनिवारी राहुल गांधी यांनी पुण्यात घेतलेल्या छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाने आधीच राजकारण तापवले होते. या कार्यक्रमामुरून भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडाही झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये ‘युवा मंथन’ कार्यक्रमाचे आयोजन केले. यावर विरोधकांनी टोला लगावत, ही राहुल गांधी यांची धास्ती असून भाजपने त्यांच्या कार्यक्रमाची थेट कॉपी केली आहे, अशी टीका केली.

Devendra Fadnavis : महायुतीतील धुसफुशीवर फडणवीसांचा ‘अल्टिमेटम’

पुण्यातील आंदोलनाचे लोण आता नागपूरपर्यंत पोहोचले आहे. नागपुरातही आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि आमदार रोहित पवार यांनी नागपुरात येऊन प्रत्यक्ष आंदोलकांची भेट घेतली. त्यांनी आदिवासी आश्रमशाळेला भेट देऊन भाजप सरकारला थेट खुले आव्हान दिले आहे.
राहुल गांधींच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे पेटलेला हा वाद आता केवळ विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपुरता मर्यादित राहिला नसून आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्षाचे नवे केंद्र बनला आहे.

error: Content is protected !!