व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Vijay wadettiwar: कुंभमेळ्यासाठी पैसे आहेत, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नाहीत का?

Vijay wadettiwar: कुंभमेळ्यासाठी पैसे आहेत, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नाहीत का?

Vijay wadettiwar attacks government after Rahul Gandhi’s X post on tribal students protest: राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर वडेट्टीवार आक्रमक, सरकारकडे कुंभासाठी पैसे विद्यार्थ्यांसाठी नसल्याचा आरोप

Nagpur आपल्या न्याय्य आणि घटनात्मक हक्कांसाठी गेल्या १० दिवसांहून अधिक काळ उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याप्रकरणी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने सोशल मीडियावर पोस्ट करत राज्य सरकारच्या कारभारावर निशाणा साधला. राहुल गांधी यांच्या या ट्विटनंतर काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मिंधे-भाजप सरकारविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली असून, दुर्गम गाव-खेड्यांतून शिक्षणासाठी आलेले हे विद्यार्थी सरकारकडे कोणतीही दया किंवा दान मागत नाहीत, तर ते त्यांचा हक्क मागत आहेत अशा शब्दांत सरकारवर घणाघाती हल्ला चढवला आहे.

पुण्यात पार पडलेल्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थिनींनी आपल्या व्यथा थेट राहुल गांधी यांच्यासमोर मांडल्या होत्या. शासकीय वसतिगृहांमध्ये असलेली ३० वर्षांची अनावश्यक वयोमर्यादा, अपमानास्पद व असुरक्षित सुविधा आणि विशेषतः महिलांसाठीची ‘गर्भधारणा तपासणी’सारख्या अत्यंत अमानवी आणि आक्षेपार्ह अटींबाबत विद्यार्थिनींनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. या प्रकारामुळे शासकीय कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली असून राहुल गांधी यांनी या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची वैयक्तिक भेट घेण्याचे आणि समस्या तातडीने सोडवण्याचे आवाहन केले.

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या ‘त्या’ ट्विटमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

याप्रकरणी विरोधकांनी सरकारला पूर्णपणे धारेवर धरले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका करताना म्हटले की, “राज्यातील सरकारकडे कुंभमेळ्यासारख्या भव्य आयोजनांवर आणि जाहिरातींवर उधळपट्टी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. परंतु, महाराष्ट्राचे भविष्य घडवणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी आणि मूलभूत सुविधांसाठी सरकारकडे पैसे नाहीत, हे अत्यंत लाजीरवाणे आहे असल्याचे वडेट्टीवार म्हणाले आहे.

error: Content is protected !!