व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Rahul Gandhi : विद्यार्थ्यावरील लाठीमार अन् पॅलेट गन प्रकरणी राहुल गांधी आक्रमक;...

Rahul Gandhi : विद्यार्थ्यावरील लाठीमार अन् पॅलेट गन प्रकरणी राहुल गांधी आक्रमक; पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडत एफआयआरची मागणी

Rahul Gandhi stages a sit-in outside a police station over the lathi-charge and pellet gun incident involving students : दिल्ली पोलीस प्रशासन आणि केंद्रीय गृह मंत्रालयापुढे मोठा पेच

New Delhi नीट पेपर फुटीविरोधात जंतर-मंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीमार आणि पोलिसांच्या कथित पॅलेट गन वापराच्या घटनेवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी अत्यंत आक्रमक मोडमध्ये आले आहेत. पॅलेट गनच्या छऱ्यांमुळे डोळ्याला गंभीर दुखापत झालेल्या साहिल या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांसह राहुल गांधी यांनी थेट पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात धडक दिली. दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत येथून हटणार नाही, असा इशारा देत त्यांनी पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यामुळे दिल्ली पोलीस प्रशासन आणि केंद्रीय गृह मंत्रालयाची मोठी अडचण झाली असून प्रशासनात खळबळ उडाली आहे.

नीट परीक्षेतील गैरव्यवहार आणि पेपर फुटीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी जंतर-मंतरवर भव्य आंदोलन छेडले होते. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीमार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या कारवाईदरम्यान पोलिसांनी पॅलेट गनचाही वापर केल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसने केला आहे. या घटनेत साहिल नावाचा तरुण विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्या एका डोळ्याची दृष्टी धोक्यात आली आहे.

Nana patole on RSS : अमेरिकेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दहशतवादी संघटना घोषित केले आहे, नाना पटोलेंचा खळबळजनक दावा

विद्यार्थ्यांच्या या तीव्र आक्रोशानंतर आणि वाढत्या राजकीय दबावानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, तसेच सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमून कठोर कायद्याची घोषणाही केली होती. पॅलेट गनचा बेकायदेशीर आणि प्राणघातक वापर करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी साहिल आणि त्याचे कुटुंबीय पोलीस ठाण्यात गेले असता, पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. ही माहिती मिळताच राहुल गांधी स्वतः पीडित विद्यार्थ्याला सोबत घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले.

देशाच्या भविष्यावर आणि विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे गोळीबार करणे आणि लाठीमार करणे अत्यंत निंदनीय आहे. जोपर्यंत दोषींवर एफआयआर नोंदवला जात नाही आणि पोलिसांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असे सांगत राहुल गांधी यांनी पोलीस ठाण्याच्या परिसरातच ठिय्या मांडला.

Sanjay Raut : धनुष्यबाण गोठवा अन् महाराष्ट्राच्या सहकारावरील ‘डल्ला’ थांबवा; संजय राऊतांचा अमित शाह, शिंदे आणि निवडणूक आयोगावर घणाघाती हल्ला

राहुल गांधींच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, आता गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलीस यावर काय मार्ग काढतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!