व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sanjay Raut: सच्चे रामभक्त असाल तर या; संजय राऊतांचे थेट देवेंद्र फडणवीसांना...

Sanjay Raut: सच्चे रामभक्त असाल तर या; संजय राऊतांचे थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र

Sanjay Raut invited CM devendra Fadnavis for ramraksha recitation: रामरक्षा पठाणाला येण्याचे दिले निमंत्रण; संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे

Nagpur नागपुरातील रामरक्षा पठण कार्यक्रमावरून आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भाजपमधील राजकीय संघर्ष आता आणखी तीव्र आणि तेवढाच उत्सुकतेचा होणार आहे. शिवसेना नेते व प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहून, तुम्ही जर सच्चे रामभक्त असाल, तर आमच्या रामरक्षा पठण उपक्रमात सहभागी व्हा, असे थेट आव्हान दिले आहे. या पत्रामुळे नागपुरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, मुख्यमंत्री फडणवीस यावर काय उत्तर देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

संजय राऊत यांनी पत्रात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हिंदुत्वाचा उल्लेख करत म्हटले आहे की, आपण प्रखर रामभक्त आणि कट्टर हिंदुत्ववादी आहात. अयोध्येतील राममंदिर मुक्त करण्यासाठी झालेल्या आंदोलनात आपण स्वतः सहभागी झाल्याचे नेहमीच सांगता. तुमच्यासारख्या लाखो रामभक्तांच्या संघर्षातून आणि त्यागातून रामजन्मभूमी मुक्त झाली आणि तिथे भव्य राममंदिर उभे राहिले. मात्र, दुर्दैवाने आज याच मंदिरात चोरी, लुटमार आणि फसवणुकीसारखे गुन्हे घडत असून शेकडो कोटींचा अपहार झाला आहे. खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही अयोध्येतील या चोरीबाबत तीव्र शोक व्यक्त केला आहे.

Uddhav Thackeray: संघाच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची वज्रमूठ ; नागपुरात ८ हजार शिवसैनिक करणार रामरक्षा पठण

रामरक्षा म्हणजे रामाची सुरक्षा, हे सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे, असे स्पष्ट करत राऊत यांनी पत्रात पुढे लिहिले आहे की, राम मंदिराच्या या लुटीबाबत लोकांमध्ये जागृती आणण्यासाठीच उद्धव सेनेने हा रामरक्षा पठणाचा उपक्रम सुरू केला आहे. मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमात केवळ सहभागीच होऊ नये, तर उपस्थित राहून सर्व रामभक्तांना शुभेच्छा द्याव्यात, असे आग्रहाचे आवाहन या पत्राद्वारे करण्यात आले आहे. संघाचे मुख्यालय आणि मुख्यमंत्र्यांच्याच शहरात शनिवारी होणाऱ्या या कार्यक्रमापूर्वी राऊतांनी टाकलेल्या या ‘पत्रबॉम्ब’मुळे भाजप बॅकफूटवर येणार की याला चोख प्रत्युत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.

High Court D : उघड्यावर थुंकणे पडणार महागात! हायकोर्टाचे कडक आदेश

दरम्यान उद्धव सेनेने रामरक्षा उपक्रमाची जोरदार तयारी सुरु केली आहे. पश्चिम नागपुरातील रामनगरातील राममंदिरात शनिवारी रामरक्षा पठण केले जाणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह उद्धव सेनेचे सर्व प्रमुख नेते यात सहभागी होणार आहे. सुमारे सात ते आठ शिवसैनिक यात सहभागी होणार असल्याचा दावा केला जात आहे. शनिवारी (ता.18) दुपारी साडेतीन वाजता हा कार्यक्रम होणार आहे. राम नगरातील राम मंदिर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराजवळ आहे. ते या मंदिरात नेहमीच जात असतात. त्यांच्या पुढाकारातून या मंदिरातून शोभायात्रेला सुरुवात झाली आहे.

error: Content is protected !!