व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir Mungantiwar : ‘आज जांच का मतलब किसी पे नहीं आयेगी आंच’;...

Sudhir Mungantiwar : ‘आज जांच का मतलब किसी पे नहीं आयेगी आंच’; भ्रष्ट अधिकाऱ्यांवर विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांचा घणाघात

Sudhir Mungantiwar Strong Attack on Corrupt Officials in the Maharashtra Assembly : गरीबांची लूट करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची विधानसभेत मुनगंटीवारांची मागणी

Mumbai: घरकुल योजना, विहीर अनुदान, जलजीवन मिशनसह विविध शासकीय योजनांमध्ये होत असल्याच्या कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर विधानसभेत माजी मंत्री, ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांविरोधात तातडीच्या कारवाईची जोरदार मागणी केली. प्रश्नोत्तराच्या तासात जालना जिल्ह्यातील तक्रारी वरील चर्चेत बोलताना त्यांनी चौकशीच्या विलंबावर, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या कथित संरक्षणावर कठोर शब्दांत टीका केली.

मुनगंटीवार म्हणाले, “१५ जून २०२६ रोजी आठ दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र आठ दिवस उलटूनही अहवाल सादर झालेला नाही. आठ दिवसांची गणना कोणालाच करता येत नाही का? अधिकाऱ्यांना नाही, संबंधित विभागाला नाही आणि उत्तर देणाऱ्या मंत्री महोदयांनाही नाही. सभागृहाला अशी उत्तरे देऊन त्याची थट्टा करू नका.”

चौकशी प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी उपरोधिक शब्दांत प्रशासनावर निशाणा साधला. “चौकशी म्हणजे नेमके काय? अधिकाऱ्याला समोर बसवून ‘पैसे घेतले का?’ एवढेच विचारायचे का? अशा पद्धतीने सत्य कधीच समोर येणार नाही,” असे ते म्हणाले.

Shah Fadnavis Meeting: अमित शाह – देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत तीन तास बैठक

यावेळी त्यांनी “आज जांच का मतलब किसी पे नहीं आयेगी आंच” या वाक्याचा उल्लेख करत सध्याच्या चौकशी प्रक्रियेवर तीव्र टीका केली. चौकशी प्रभावी आणि निष्पक्ष व्हावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.

“निलंबन ही शिक्षा नसते. चौकशीवर कोणाचाही प्रभाव पडू नये म्हणून ती आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया असते. संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करा, मग चौकशी अहवाल आठ दिवसात नाही तर दुसऱ्याच दिवशी येईल,” असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

गरीब लाभार्थ्यांकडून पैसे उकळल्याच्या आरोपांवर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “घरकुल, विहीर अनुदान किंवा इतर योजनांचा लाभ मिळवण्यासाठी जर गरीबांकडून पैसे घेतले जात असतील, तर अशा अधिकाऱ्यांना कोणतीही सहानुभूती दाखवू नका. ज्यांनी गरीबांचे पैसे घेतले असतील त्यांच्याकडून ते वसूल करून संबंधित लाभार्थ्यांना परत मिळाले पाहिजेत,” अशी मागणी त्यांनी केली.

यावर उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तक्रारींमध्ये भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त करण्यात आल्याचे सांगितले. संबंधित तक्रारींची चौकशी सुरू असून दोषी आढळणाऱ्या कोणालाही वाचवले जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.

Anjangao Municipal council : अंजनगाव पालिकेत नवे राजकीय समीकरण? काँग्रेसच्या भूमिकेवर पक्षातच प्रश्नचिन्ह

मंत्री गोरे म्हणाले, “सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलेल्या भावना योग्य आहेत. दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई केली जाईल. तक्रारींमध्ये ठेकेदारांना पैसे देताना अनियमितता आणि कमिशनखोरीचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.”

घरकुल योजना, विहीर अनुदान आणि इतर कल्याणकारी योजनांमधील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा विधानसभेत ऐरणीवर आला. या चर्चेत सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेले मुद्दे आणि चौकशी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची केलेली मागणी अनेक सदस्यांच्या भावनांना वाचा फोडणारी ठरली. त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेत प्रशासनाला अधिक जबाबदार बनविण्याची गरज अधोरेखित केली.

error: Content is protected !!