How Do Legislative Council MLAs Benefit the Public? Sudhir Mungantiwar Poses a Tough Question : मुनगंटीवार म्हणाले, वर्षभर आचारसंहिता, मग विकासकामे करायची कधी?
Chandrapur : राज्यात लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि त्यानंतर विधान परिषद अशा एकापाठोपाठ एक निवडणुका सातत्याने सुरूच आहेत. प्रत्येक निवडणुकीची किमान एक महिना आचारसंहिता असते. वर्षभर जर हेच चक्र सुरू राहणार असेल, तर सरकारने आणि लोकप्रतिनिधींनी जनतेची आणि विकासाची कामे केव्हा करायची, अशी संतप्त विचारणा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा अस्तित्वात नसताना विधान परिषदेची निवडणूक कशी काय घेण्यात आली, असा खडा सवाल करत त्यांनी निवडणूक पद्धतीवर थेट हल्ला चढवला आहे. विधान परिषदेच्या निवडणुका रद्दच केल्या पाहिजेत, कारण त्याचा जनतेला काही एक फायदा होत नाही, असे रोकठोक मत व्यक्त करून मुनगंटीवार यांनी हे सर्व आता कुठेतरी थांबले पाहिजे असे स्पष्ट केले. तसेच आपण या गंभीर संदर्भात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पत्रव्यवहार करून त्यांचे लक्ष वेधणार असल्याचे जाहीर केले.
Nagpur’s political heavyweight : नागपूरचे राजकीय वजन वाढले; जिल्हा आता 19 आमदारांचा
महाराष्ट्रातील अनेक जिल्हा परिषदांच्या निवडणुका गेल्या वर्ष-दोन वर्षांपासून खोळंबल्या आहेत. ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जिल्हा परिषदाच अस्तित्वात नसताना, त्यांच्या परिसरातून विधान परिषदेची निवडणूक घेणे अजिबात संयुक्तिक नाही, असे मुनगंटीवार म्हणाले. विधान परिषदेच्या आमदारांचा ग्रामीण भागातील जनतेला काहीही फायदा होत नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या नसताना आणि त्याचे अस्तित्वच नसताना इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे हा सरळसरळ ग्रामीण भागातील जनतेवर अन्याय आहे, अशी आक्रमक तोफ त्यांनी डागली.
Sudhir Mungatiwar : मुनगंटीवारांचा दणका अन् राज्यात ‘लिंकिंग’चा खेळ खल्लास
लोकप्रतिनिधींच्या निवडीवरही त्यांनी आपले रोकठोक मत व्यक्त करत, ज्यांना कोणाला आमदार व्हायचे असेल त्यांनी थेट जनतेतून निवडून आले पाहिजे, असा सल्ला दिला. सततच्या निवडणुकांमुळे राज्याचा विकास आणि प्रशासकीय कामे पूर्णपणे ठप्प होतात, त्यामुळे यावर गांभीर्याने विचार होणे गरजेचे असून आपण पंतप्रधानांकडे हा विषय लावून धरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुनगंटीवार यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आता मोठी खळबळ उडाली आहे.








