व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home प्रशासकीय Dj controversy : पुण्यात डीजेवरून वाद, नागपुरात मात्र पोलिसांचा थेट आदेश !

Dj controversy : पुण्यात डीजेवरून वाद, नागपुरात मात्र पोलिसांचा थेट आदेश !

pune-dj-controversy-nagpur-police-ban-dj-laser-lights-till-november-1 : १ नोव्हेंबरपर्यंत डीजे आणि लेझर लाईट्सवर बंदी

Nagpur : गणेशोत्सवात डीजे वाजवण्याच्या मुद्द्यावरून राज्यातील विविध शहरांमध्ये चर्चा आणि वाद सुरू असतानाच नागपूर पोलिसांनी डीजे आणि लेझर लाईट्सबाबत कठोर भूमिका घेतली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शहरात डीजे तसेच डोळ्यांना इजा पोहोचवू शकणाऱ्या लेझर लाईट्सच्या वापरावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. ही बंदी १ नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहे.

नागपुरात पोलिसांकडून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू असताना पुण्यात मात्र डीजेच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. डीजेच्या मोठ्या आवाजाविरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांना गणेश मंडळांच्या काही पदाधिकाऱ्यांकडून मारहाण तसेच सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पुण्यात डीजेच्या मुद्द्यावरून नव्याने वाद निर्माण झाला आहे.

Sanjay Raut : मोदींनंतर ‘तो’ कोण? राऊतांचा मोठा दावा; उपपंतप्रधानपदासाठी संघाच्या मर्जीतील नेत्याचे नाव चर्चेत!

या विषयाचे पडसाद पुणे भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीतही उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकर सुसंस्कृत असून, त्यांनीच याबाबत निर्णय घ्यावा, अशी भूमिका मांडली. त्यामुळे डीजेच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी थेट भूमिका घेण्याऐवजी स्थानिक पातळीवर निर्णय होण्याचे संकेत दिले. दरम्यान, नागपुरात भाजपचे माजी आमदार संदीप जोशी यांनी डीजेच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी सातत्याने लावून धरली होती. गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषण आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन त्यांनी डीजेबंदीची भूमिका मांडली होती.

नागपुरात डीजेच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणावर विरोध न झाल्याने आणि ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा लक्षात घेऊन पोलिसांनी कठोर निर्णय घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुण्यात डीजेच्या वापरावरून वाद आणि राजकीय चर्चा सुरू असताना नागपुरात मात्र पोलिसांच्या आदेशामुळे गणेशोत्सवासाठी डीजे आणि लेझर लाईट्सच्या वापरावर निर्बंध आले आहेत. दरम्यान, नागपूर पोलिसांच्या या निर्णयाची अंमलबजावणी गणेशोत्सवाच्या काळात किती प्रभावीपणे होते आणि गणेश मंडळांकडून त्याला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे आता लक्ष लागले आहे.
___

error: Content is protected !!