व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Uddhav Thackeray : पंचनाम्यासाठी ५ ऑक्टोबरची वाट का? महायुती सरकारवर उद्धव ठाकरेंचा...

Uddhav Thackeray : पंचनाम्यासाठी ५ ऑक्टोबरची वाट का? महायुती सरकारवर उद्धव ठाकरेंचा सरकारवर सल्ला

Uddhav Thackeray demands an immediate three-day special session of the legislature on draught situation : तातडीने ३ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलविण्याचे आवाहन

Mumbai महाराष्ट्रात महाभयंकर नैसर्गिक संकट ओढावले असताना मुख्यमंत्री आणि मंत्री नक्की काय करत आहेत, ते काजू-बदाम खाण्यासाठी दौरे करत आहेत का, असा घणाघाती सवाल करत उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यात शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला असताना सरकारने पंचनाम्यासाठी ५ ऑक्टोबरपर्यंत वाट न पाहता तातडीने मदत जाहीर करावी आणि परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ३ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळण्याची अपेक्षा असताना सरकारने केवळ उपसमिती स्थापन केली आणि मंत्र्यांचे दौरे निश्चित केले, एवढे भीषण संकट समोर असताना पंचनाम्यासाठी ५ ऑक्टोबरची वाट कशासाठी बघता, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अधिवेशनात दिलेल्या आश्वासनांना सरकार बांधील असते, त्यामुळे तातडीने अधिवेशन बोलावून सर्व आमदारांना त्यांच्या भागातील परिस्थिती मांडू द्यावी आणि सरकारने घेतलेल्या निर्णयांचा एक अधिकृत डॅशबोर्ड तयार करून त्यावर मदतीची सर्व सविस्तर माहिती प्रसिद्ध करावी, असे ते म्हणाले.

Raj Thackeray : निवडणुका म्हणजे निव्वळ ‘मॅचफिक्सिंग’, राज ठाकरेंचा घणाघाती हल्ला

वर्षानुवर्षे कर्जमाफीची प्रक्रियाच सुरू असते, मागील कर्जमाफीची रक्कम अद्याप अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही आणि १ रुपयाच्या विम्याची तर निव्वळ थट्टाच झाली आहे, असा आरोप करत आता जाहीर होणारी मदत नक्की किती वर्षांनी देणार हे सरकारने स्पष्ट करावे, अशी टीका त्यांनी केली.

शेवटी, अन्नदात्याची थट्टा न करता तातडीने सरसकट कर्जमाफी करून त्याची यादी डॅशबोर्डवर लावावी, जेणेकरून शेतकरी आणि जनतेला नक्की किती मदत मिळाली हे सर्वांना कळेल, असा आक्रमक इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

error: Content is protected !!