व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Raj Thackeray : निवडणुका म्हणजे निव्वळ ‘मॅचफिक्सिंग’, राज ठाकरेंचा घणाघाती हल्ला

Raj Thackeray : निवडणुका म्हणजे निव्वळ ‘मॅचफिक्सिंग’, राज ठाकरेंचा घणाघाती हल्ला

‘Elections are nothing but match-fixing,’ Raj Thackeray launches scathing attack : बॅलेट पेपरसाठी सर्व विरोधी पक्षांना केले एकजुटीचे आवाहन

Mumbai लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये झालेला भाजपचा विजय हा पारदर्शक नसून निव्वळ ‘मॅचफिक्सिंग’चा खेळ होता, असा सनसनाटी आरोप करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

देशात विरोधाचे वातावरण असतानाही भाजपला मिळालेले मताधिक्य नक्की कशामुळे आणि कोणाच्या भरोशावर मिळाले, हे आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा तातडीने राजीनामा घेतलाच पाहिजे, अशी आक्रमक मागणी करत लोकशाही वाचवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी तीव्र जनआंदोलन उभारावे, असे खुले आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

Shivsena, trinmool congress : शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लवकरच फैसला?; सर्वोच्च न्यायालयाचे संकेत

मुख्य निवडणूक आयुक्तांनी भाजपला फायदा पोहोचवण्यासाठीच विशेष सखोल पुनरीक्षणाचा’ कार्यक्रम राबवून विरोधकांची हक्काची मते मतदार याद्यांमधून वगळल्याचा खळबळजनक दावा राज ठाकरेंनी केला. निवडणूक आयोगातील इतर दोन आयुक्तांनी या निर्णयावर आक्षेप घेतला होता, तरीही ज्ञानेश कुमार यांनी कोणाचेच न ऐकता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या इशाऱ्यावरून विरोधकांना संपवण्याचे डावपेच आखले, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

Krushna Khopde, Prafulla Gudadhe : गुडधेंकडून संघाची तुलना तालिबानशी; खोपडे म्हणतात, ‘काँग्रेसला बाबर चालतो का?’

मनसेच्या सभांना मोठी गर्दी होते, पण मते मिळत नाहीत असा प्रश्न नेहमी विचारला जात होता; मात्र आमची मते नक्की कुठे गायब होतात हे या षड्यंत्रामुळे आता स्पष्ट झाले आहे, असा घणाघात त्यांनी केला. त्यामुळे आता सर्व विरोधकांना पहिली लढाई निवडणूक आयोगाविरोधातच लढावी लागणार असून, निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येत पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला सरकारला भाग पाडले पाहिजे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

error: Content is protected !!