व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Vijay Wadettiwar : जरांगेंच्या दबावाखाली सरकार झुकले, ओबीसींचे वाटोळे केले; विजय वडेट्टीवारांचा...

Vijay Wadettiwar : जरांगेंच्या दबावाखाली सरकार झुकले, ओबीसींचे वाटोळे केले; विजय वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

Government buckled under Manoj Jarange’s pressure and harmed OBC interests; Vijay Wadettiwar attacks : ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन

Nagpur मनोज जरांगे पाटील यांच्या दबावाखाली येऊन महायुती सरकारने मराठ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून, या निर्णयामुळे सरकारने ओबीसी समाजाचे पूर्णपणे वाटोळे केले आहे, असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याला आमचा कधीही विरोध नव्हता आणि पुढेही राहणार नाही, मात्र हे आरक्षण ओबीसींच्या कोट्यातून न देता स्वतंत्रपणे दिले पाहिजे, अशी आमची स्पष्ट भूमिका होती, असे वडेट्टीवार म्हणाले. सरकारने आपली तिजोरी खुली करून मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे, पण ते करताना ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक होते, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

Manoj Jarange : जरांगेंचे उपोषण सुटले, पण महायुतीची डोकेदुखी कायम;

वारंवार आमरण उपोषण करून जरांगे यांनी सरकारला पूर्णपणे कोंडीत पकडले आणि त्याच दबावात येऊन सरकार हलले व शेवटी झुकले, असा टोला त्यांनी लगावला. याच वेळी वडेट्टीवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाच्या कोणत्या १२ मागण्या पूर्ण केल्या होत्या, हे फडणवीस यांनी जाहीर करून दाखवावे, असे खुले आव्हान त्यांनी दिले.

मनोज जरांगे मागील 20 दिवसांपासून आमरण उपोषणा बसले होते. मराठा-कुणबी असा उल्लेख असलेल्या सर्व मराठा समाजाच्या उमेदवारांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी त्यांनी केली होती. एकूण 58 लाख नोंदी अशा सापडल्या आहेत. त्या सर्वांना जात प्रमाणपत्र द्यावे आणि वैधता प्रदान करावी अशी मागणी त्यांची आहे. सरकारने पुरावे दिल्यास जात प्रमाणपत्र देण्याचे मान्य केले आहे. हे प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्यांना ओबीसीतून आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.

error: Content is protected !!