व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Vijay Wadettiwar : जरांगेंच्या कोणत्या १२ मागण्या पूर्ण केल्या? सरकारने जाहीर करावे

Vijay Wadettiwar : जरांगेंच्या कोणत्या १२ मागण्या पूर्ण केल्या? सरकारने जाहीर करावे

Which 12 demands of Jarange have been fulfilled? Government should make them public, asks Vijay Wadettiwar : ओबीसी आरक्षणाचे खंदे समर्थक विजय वडेट्टीवारांचा सवाल

Nagpur मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी मुंबईच्या दिशेने सुरू केलेल्या आंदोलनामुळे महायुती सरकारची कोंडी झाली असतानाच, आता यावरून राजकीय युद्ध अधिक पेटले आहे. जरांगे यांच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य केल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांकडून केला जात आहे.

मात्र, जरांगेंच्या कोणत्या १२ मागण्या पूर्ण केल्या, हे सरकारने तत्काळ जाहीर करावे आणि आम्हालाही कळू द्या, अशी थेट मागणी करत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. १२ मागण्या पूर्ण झाल्याचा दावा केला जात असताना सरकार त्या स्पष्ट करायला तयार का नाही, सरकार नेमके काय लपवत आहे, असा संशयही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

ओबीसी आरक्षणाचे खंदे समर्थक असलेल्या वडेट्टीवार यांनी यापूर्वीही मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, परंतु त्यांचा ओबीसी कोट्यात समावेश करू नये, अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. तसेच ओबीसी आरक्षणाची टक्केवारी वाढवण्याची मागणीही त्यांनी केली होती. आता सरकारच्या या दाव्यावर प्रश्न उपस्थित करून वडेट्टीवार यांनी महायुतीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

Ashish Shelar, Manoj Jarange : शिवराळ भाषा खपवून घेणार नाही, आशिष शेलारांचा जरांगेंना थेट इशारा

दुसरीकडे, जरांगे यांच्याकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर होणाऱ्या टीकेला भाजपने कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी महायुती सरकारची बाजू मांडताना जरांगे यांच्या शिवराळ भाषेवर तीव्र संताप व्यक्त केला. “यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतचा एकेरी उल्लेख किंवा शिवराळ भाषा अजिबात खपवून घेतली जाणार नाही,” असा थेट इशारा शेलार यांनी दिला. ऐन सणासुदीच्या काळात मुंबईत येऊन वाहतुकीची कोंडी करणे अयोग्य असल्याचे सांगत, न्यायालयीन प्रकरणांशिवाय बाकी मागण्यांवर सरकार चर्चेसाठी आजही तयार असल्याचे शेलार म्हणाले.

illegal moneylending : अवैध सावकारीवरील शिक्षेत वाढ; सावकारग्रस्त शेतकरी समितीच्या लढ्याला यश

आशिष शेलार यांनी जरांगे यांच्या आंदोलनाच्या हेतूवरच शंका उपस्थित केली. फडणवीस आणि शिंदे यांनी मराठा समाजाला ईडब्ल्यूएसअंतर्गत १० टक्के आरक्षण दिले आणि कुणबी-मराठा नोंदी असणाऱ्यांना दाखले दिले. तरीही जरांगे त्यांच्यावरच आरोप करत आहेत. दुसरीकडे, ज्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकाळात मराठा समाजाचे आरक्षण घालवले, त्यांच्याबाबत जरांगे एक शब्दही बोलायला तयार नाहीत. ज्यांनी आरक्षण दिले त्यांच्यावर टीका करायची आणि ज्यांनी घालवले त्यांच्याबाबत मौन बाळगायचे, यामुळे त्यांच्या आंदोलनावर लोकांना शंका आहे. ती त्यांनीच दूर करावी असे आवाहन शेलार यांनी केले.

error: Content is protected !!