Vijayraj shinde met cm devendra fadnavis for legislative council candidature : नागपूर दौऱ्याने राजकीय चर्चा रंगल्या : बुलढाण्यात ‘एमएलसी’च्या शर्यतीला वेग
Buldhana अलीकडील काळात राज्याच्या राजकारणात विधानपरिषद निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अशा परिस्थितीत भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून ‘तिकीट’ मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा रंगत आहेत. विजयराज शिंदे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी झालेली भेट ही त्याचाच एक भाग असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
स्थानिक स्तरावर भाजपमध्ये ‘एमएलसी’साठी इच्छुकांची संख्या वाढत असल्याने अंतर्गत स्पर्धा तीव्र होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांची ही भेट केवळ औपचारिक न राहता, स्वतःची दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, भेटीनंतर कोणतीही अधिकृत माहिती पुढे न आल्याने चर्चांना अधिकच उधाण आले आहे.
Malkapur municipal council : मलकापुरात नियोजनाचा ‘कचरा’, शिवसेना आक्रमक
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणात आणखी एक समीकरण चर्चेत आले आहे. शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना राजकीय तोल साधण्यासाठी भाजपकडून विजयराज शिंदे यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. या शक्यतेमुळे आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
OBC federation : गॅस कनेक्शनवरून ‘क्रेडिट’ची लढाई; खामगावात भाऊ विरुद्ध सत्ताधारी आमनेसामने
राजकीय विश्लेषकांच्या मते, अशा भेटी केवळ औपचारिकतेपुरत्या मर्यादित नसतात. त्या माध्यमातून पुढील रणनीती, संघटनात्मक बदल आणि संभाव्य उमेदवारांची चाचपणीही केली जाते. त्यामुळे विजयराज शिंदे यांची ही भेट आगामी राजकीय घडामोडींची नांदी ठरू शकते. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने झालेली ही भेट आता बुलढाणा जिल्ह्यात ‘एमएलसी’च्या शर्यतीची चाहूल देणारी ठरत असून, पुढील काही दिवसांत या चर्चांना अधिक स्पष्ट दिशा मिळण्याची शक्यता आहे.








