व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण ‘शेतकरी वाचला तर महाराष्ट्र वाचेल’ म्हणत वडेट्टीवारांचा आंदोलनाचा इशारा

‘शेतकरी वाचला तर महाराष्ट्र वाचेल’ म्हणत वडेट्टीवारांचा आंदोलनाचा इशारा

वर्ध्यात दुष्काळाची पाहणी करत सरकारवर हल्लाबोल

Wardha : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता फेब्रुवारी-मार्चमध्येच स्पष्ट झाली होती. त्यानंतरही सरकारने वेळीच नियोजन करून पाणी, चारा आणि आर्थिक मदतीसाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे आज शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटासोबतच आर्थिक संकटालाही सामोरे जावे लागत आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विजय वडेट्टीवार यांनी दौरा केला. कारंजा येथील काँग्रेस कमिटी कार्यालयात शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून दौऱ्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी पिकांची स्थिती, वाढता उत्पादन खर्च, पाण्याची समस्या आणि अपेक्षित उत्पन्नात झालेली घट याबाबत आपल्या व्यथा मांडल्या.

शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकल्यानंतर वडेट्टीवार यांनी थेट बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. पारडी येथे अमोल चाफले, विजय हिरुडकर, अशोक हिरुडकर, प्रशांत राऊत, अशोक पापडकर, मनोज डायरे आणि श्रीकृष्ण पापडकर यांच्या शेतातील कपाशी पिकाची पाहणी करण्यात आली. कपाशीच्या सद्यस्थितीची माहिती घेताना उत्पादनावर होणारा परिणाम आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणी त्यांनी जाणून घेतल्या.

तपासणीसाठी गेलेल्या दक्षता पथकासह आमदार पोहोचले पोलीस ठाण्यात!

यावेळी वडेट्टीवार यांनी सरकारला इशारा देताना सांगितले की, शेतकरी संकटात असताना केवळ घोषणा आणि आश्वासनांचा उपयोग नाही. शासनाने प्रत्यक्ष मदतीसाठी तातडीने निर्णय घेतले पाहिजेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष सुरू राहिल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

दुष्काळाच्या मातीत नाना पाटेकर यांच्या‘नाम’चा जलसंवर्धनाचा हात

या दौऱ्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा आर्वी विधानसभा काँग्रेस नेते अनंत मोहोड, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुनील कोल्हे, उपाध्यक्ष चंद्रशेखर जोरे यांच्यासह भास्कर पांडे, गुणवंत मुडे, उमेश पाचपोहर, मेघराज चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते. विधानसभा संघटक बाळासाहेब वेरुळकर, विनोद पाटील, विश्वभूषण पाटील, संजय शिरसकर, अविनाश ठाकरे तसेच काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. ‘शेतकरी वाचला तर महाराष्ट्र वाचेल. त्यामुळे सरकारने आता कागदावरील घोषणा थांबवून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत द्यावी,’ अशी आक्रमक मागणी वडेट्टीवार यांनी केली.

error: Content is protected !!