व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र MSRTC : दिवाळीच्या तोंडावर एसटीची चाके थांबणार?

MSRTC : दिवाळीच्या तोंडावर एसटीची चाके थांबणार?

ST employees to go on strike just before Diwali : एसटी संयुक्त कृती समितीचा आंदोलनाचा इशारा

Amravati वेतनवाढ, दिवाळी बोनस यांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी येत्या १३ ऑक्टोबरपासून मुंबईत धरणे आंदोलन करण्याचा इशारा एसटी संयुक्त कृती समितीने दिला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील अनेक कामगार संघटनांनी एकत्र येऊन संयुक्त कृती समिती स्थापन केली आहे. दिवाळीच्या आठवडाभर आधी आंदोलन होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सप्टेंबर २०२४ मध्ये एसटी कर्मचाऱ्यांना साडेसहा हजार रुपयांची वेतनवाढ देण्यात आली होती. मात्र, एक एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२४ या कालावधीतील वेतनवाढीची थकबाकी, २०१८ पासून प्रलंबित असलेली महागाई भत्त्याची थकबाकी, तसेच एप्रिल २०१६ ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीतील वार्षिक वेतनवाढीच्या एक टक्के वाढीव दराची आणि घरभाडे भत्त्याच्या वाढीव दराची थकबाकी मिळावी, अशा मागण्या समितीने पुढे केल्या आहेत.

Banjara community : ‘एक गोर, सव्वा लाखेर जोर’, बंजारा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर

कामगार सन करारातील तरतुदीनुसार राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता देण्याचे मान्य केले आहे. सध्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ५५ टक्के, तर एसटी कर्मचाऱ्यांना ५३ टक्के महागाई भत्ता मिळतो. तो समान म्हणजे ५५ टक्के करावा, पंधरा हजार रुपये दिवाळी भेट द्यावी, या व इतर मागण्यांसाठी हे आंदोलन होणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.

शासनाने या मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव मोहीम देशमुख यांनी दिला.

error: Content is protected !!