MLAs statement created a stir thanks to Bhaiyyuji Maharaj : भय्यूजी महाराजांमुळे वाचले, आमदारांच्या विधानाने खळबळ
Mumbai : राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवणारा धक्कादायक खुलासा करत राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी दावा केला आहे की माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचा इंदोरमध्ये खून होणार होता पण दिवंगत भय्यूजी महाराजांमुळे ते वाचले. एका सभेत केलेल्या या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला केंद्रे यांच्यासाठी गंगाखेड येथे आले होते. यावेळी त्यांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर शेतकऱ्यांच्या नावावर १६०० कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याचा आरोप करत जोरदार टीका केली होती. या आरोपांनंतर आता प्रत्युत्तर देताना रत्नाकर गुट्टे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
Local Body Elections : धक्कादायक; खामगावात मतदारांना पैसे वाटण्याचा प्रयत्न उधळला!
सभेत बोलताना गुट्टे म्हणाले की, “तुम्ही सुरुवात केली आहे पण शेवट मी करणार आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव करण्यासाठी किती ताकद वापरली हे सर्व मला माहीत आहे. पण माझी गंगाखेडची जनता हेच माझं बुलेटप्रुफ जॅकेट आहे. मी कोणत्याही पक्षाच्या स्टेजवर जाऊ शकतो, मी राजा आहे. पण धनु भाऊ, तुमचा निकाल लावल्याशिवाय राहणार नाही.”
Rural Development : नियुक्ती मिळाली नाही, मानधनही थकले! समन्वयकांचे कामबंद आंदोलन
त्यानंतर बोलताना त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले, “जगमित्र साखर कारखान्यासाठी शेअर्सच्या नावाखाली घेतलेले पैसे कुठे गेले? देवस्थानच्या जमिनी खाल्ल्या, हे सर्व बाहेर काढणार आहे.” त्याचबरोबर गंगाखेड साखर कारखान्याबाबत आरोपांना उत्तर देताना त्यांनी सांगितले की कारखान्याने १०६ कोटींचे कर्ज फेडले आहे आणि शेतकऱ्यांच्या नावावर कोणतेही कर्ज शिल्लक नाही. शेतकऱ्यांच्या सिबिल समस्येसाठीही उपाययोजना सुरू असल्याचा त्यांनी दावा केला.
Local Body Elections : बोगस मतदान करण्याचा प्रयत्न, दोघे ताब्यात
याच भाषणात सर्वात खळबळजनक विधान करत गुट्टे म्हणाले, “धनंजय मुंडे यांचा इंदोरमध्ये मर्डर झाला असता पण भय्यूजी महाराज यांनी त्यांना वाचवलं. ते त्या वेळी कोणत्या हॉटेलमध्ये होते याची देखील मला माहिती आहे. पण मी सगळेच आता उघड करणार नाही.”
या विधानाने राज्यात चर्चेला उधाण आले असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंडे-गुट्टे संघर्ष चिघळत असताना या आरोपांवर धनंजय मुंडे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. पुढील काही दिवसांत ही बाब राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण करण्याची शक्यता स्पष्ट दिसत आहे.
—








