व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Election commission : ४७,८२० मतदारांचे पत्ते गायब; विशेष पुनरीक्षण मोहिमेसमोर मोठे आव्हान

Election commission : ४७,८२० मतदारांचे पत्ते गायब; विशेष पुनरीक्षण मोहिमेसमोर मोठे आव्हान

Addresses of 47,820 voters found missing; major challenge for the Special Summary Revision drive : पडताळणीशिवाय नाव वगळू नका, आयोगाचा स्पष्ट आदेश

Amravati भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेदरम्यान अमरावती जिल्ह्यातील तब्बल ४७ हजार ८२० मतदारांच्या नोंदणीकृत पत्त्यांचा मागोवा लागत नसल्याचे समोर आले आहे. विशेषतः जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बडनेरा विधानसभा मतदारसंघात ही समस्या गंभीर स्वरूपात आढळल्याने निवडणूक प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

आयोगाने दिलेली मुदत आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने संबंधित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेऊन प्रशासनाने परिस्थितीची माहिती दिली आहे.

मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विवेक जाधव यांनी सांगितले की, अनेक मतदारांच्या नोंदणीकृत पत्त्यावर ते वास्तव्यास नसल्याचे आढळून आले आहे. सरकारी बीएलओ तसेच विविध राजकीय पक्षांनी नियुक्त केलेले बीएलए यांच्या माध्यमातून संबंधित मतदारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. मात्र, घराघरात जाऊन पडताळणी करूनही मोठ्या संख्येने मतदारांचा संपर्क होत नसल्याने त्यांचे गणना अर्ज अद्याप भरले गेलेले नाहीत.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या समृद्धी महामार्गाच्या विस्ताराला विदर्भातूनच विरोध

विशेष पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत प्रत्येक मतदाराचा गणना अर्ज स्वतः किंवा कुटुंबप्रमुखाच्या स्वाक्षरीने प्राप्त होणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच संबंधित मतदाराचे नाव अंतिम मतदार यादीत कायम राहणार आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप गणना अर्ज भरलेला नाही, त्यांनी तातडीने संबंधित बीएलओ किंवा बीएलएशी संपर्क साधून अर्ज सादर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने कोणत्याही मतदाराचे नाव वगळण्यापूर्वी सखोल पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. एक नव्हे, तर दोन ते तीन वेळा प्रत्यक्ष भेट देऊन खातरजमा करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.

प्रशासनाच्या मते, पत्ता बदललेले मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरित नागरिक, दीर्घकाळ अनुपस्थित असलेले मतदार किंवा दुबार नोंदणी झालेल्या मतदारांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असण्याची शक्यता आहे. मात्र, प्रत्यक्ष संपर्क होत नसल्याने यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे.

Akola Congress : जुन्यांना मानाचे स्थान, कार्यकर्त्यांना सन्मान आणि नवोदितांना संधी

या विशेष पुनरीक्षण मोहिमेचा कालावधी १ जून ते ८ ऑगस्ट २०२६ असा असून, या कालावधीत प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे. चुकीने कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले जाणार नाही, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!