Akola District Congress announces a 52-member executive committee : अकोला जिल्हा काँग्रेसची ५२ सदस्यीय कार्यकारिणी जाहीर
Akola अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून प्रकाश तायडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रविवारी जिल्हा काँग्रेसची ५२ सदस्यीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जिल्हा काँग्रेसच्या इतिहासात प्रथमच इतक्या मर्यादित आणि सुटसुटीत स्वरूपाची कार्यकारिणी जाहीर झाल्याने पक्षात तिची विशेष चर्चा सुरू आहे.
या कार्यकारिणीत सर्व जाती, धर्म आणि समाजघटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अनुभवी पदाधिकाऱ्यांना मानाचे स्थान देतानाच पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला असून नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा काँग्रेसमधील प्रत्येक पदाला अधिक महत्त्व प्राप्त झाल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
नव्या कार्यकारिणीचे पक्षाच्या विविध स्तरांतून स्वागत होत असून पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव आणि प्रवक्तापदांसह विविध जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी – ५२ सदस्यीय कार्यकारिणी
उपाध्यक्ष (१०)
बाळकृष्ण बोंद्रे
हिम्मतराव घाटोळे
मो. जमीर शेख इब्राहिम (जम्मू सेठ)
सारंग मालाणी
रवी राठोड
सतीश हाडोळे
मुकुंद सनगाडे
अनिल चहाकर
सुनील माडेकर
सय्यद कमरुद्दीन
कोषाध्यक्ष
डॉ. प्रमोद चौरे – कोषाध्यक्ष
वसंतराव पवार – सहकोषाध्यक्ष
सरचिटणीस (१७)
महफूज खान
बाळासाहेब गुहाने
सोमेश लक्ष्मणराव दिघे
निनाद मानकर
सुरेश पाटील दौड
शैलेन्द्र जयचंद अजमेरा
दीपक पोहरे
गजानन अलाट
शब्बीर अली रहमत अली
मोहम्मद खालिद
सोहेल खान
डॉ. फैय्याज अन्सारी
अतुल खोतरे
रामा सुरेश महल्ले
बिस्मिल्ला सर
गजानन डाफे
विजय देशमुख
सचिव (२२)
अजहर शेख
गजानन बोमटे
हिदायत खान रूमखान
संजय गिर्हे
प्रशांत देशमुख
नजाकत खान
विजय पचारे
आनंदराव सोनटक्के
विनोद आंबुस्कर
विश्वजीत देशमुख
दिलीप चव्हाण
गणेश अभ्यंकर
सुधाकर शिंदे
संतोष डिवरे
रेहान देशमुख
शाम पुर्णाजी पाटील तराळे
अनिल दिनकर देशमुख
मोसिन शहा
डॉ. प्रमोद हरिश्चंद्र अरबट
फिरोज पठाण
मोहन अंजनकर
तश्वर पटेल
प्रवक्ता
संजय आठवले








