Gudhdhe compares the RSS with the Taliban; Khopde asks, ‘Is Babur acceptable to the Congress?’ : ५० वर्षांत विकासकामांत शुन्य कामगिरी केल्याची काँग्रेसवर टीका
Nagpur राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना थेट तालिबानी संघटनेशी करणारे नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष प्रफुल गुडधे यांच्यावर भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसला देशविरोधी मानसिकतेची सवय जडली असून, तुम्हाला राष्ट्रभक्त संघ सलतो, मग सनातन धर्मावर आक्रमणे करणारा बाबर चालतो का असा बोचरा सवाल करत खोपडे यांनी गुडधे यांच्या मानसिकतेचा आणि काँग्रेसच्या राजकारणाचा खरपूस समाचार घेतला आहे.
विकासकामांच्या नावावर काँग्रेस पूर्णपणे शून्य असून, देशविरोधी व दहशतवादी संघटनांना समर्थन देणाऱ्या काँग्रेसने गेल्या ५० वर्षांत नागपूर शहराला फक्त अंधारात ठेवण्याचेच काम केले आहे, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला. आमदार खोपडे पुढे म्हणाले की, भाजपच्या राजवटीत नागपूर शहर आज देशामध्ये विकासाचे मॉडेल ठरले असून शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून मुक्तता मिळण्यासाठी शहराच्या चारही दिशांना उड्डाणपुलांचे जाळे उभारण्यात आले आहे.
Amit Shah, Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार हे तर अमित शहांचे ‘छोटा शकील’, संजय राऊतांचा थेट आरोप
या विकासकामांचे नागपूरकर कौतुक करत आहेत. संपूर्ण जगभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रकारणाची चर्चा होत असताना, अशा राष्ट्रभक्त संघटनेवर काँग्रेस अध्यक्षांनी केलेले आरोप अत्यंत निंदनीय आहेत. हिजबुल मुजाहिदीन ही हजारो निष्पाप नागरिकांचा बळी घेणारी दहशतवादी संघटना आहे आणि अशा संघटनचे काँग्रेस अप्रत्यक्ष समर्थन करते. संघासारख्या देशभक्त संघटनेला दहशतवाद्यांशी जोडण्याचा प्रयत्न करून काँग्रेस किती खालच्या पातळीवर पोहोचली आहे, हेच यावरून दिसून येते.
काँग्रेसच्या भूतकाळातील निर्णयांचा पाढा वाचताना खोपडे म्हणाले की, नागपूर महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता असताना हसनबाग येथील एका प्रवेशद्वाराला ‘बाबर’चे नाव देण्यात आले होते. ज्या बाबरने सनातन धर्मावर आक्रमणे केली आणि देशातील अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली, अशा आक्रमकाचे नाव सार्वजनिक ठिकाणाला देताना काँग्रेसला लाज वाटली नव्हती का?
आज राष्ट्रभक्त संघटनांवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या काँग्रेसने प्रथम आपल्या सत्ताकाळातील अशा हिंदूविरोधी निर्णयांचे स्पष्टीकरण जनतेसमोर द्यावे. निष्फळ आरोप-प्रत्यारोप करून वातावरण बिघडवण्यापेक्षा काँग्रेसने नागपूर शहराच्या विकासावर आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर बोलावे. नागपूरच्या नागरिकांना विकास हवा आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरच जनतेसमोर आपली भूमिका मांडणे काँग्रेसला अधिक योग्य ठरेल, असा टोलाही खोपडे यांनी लगावला.








