21 employees were absent at the flag hoisting ceremony : मोताळा पंचायत समितीतील प्रकार; सर्वांना कारणे दाखवा नोटीस, कारवाईचे संकेत
Buldhana महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण कार्यक्रमात गैरहजर राहून मोताळा पंचायत समितीच्या तब्बल २१ कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबद्दल सर्वांना ‘शो कॉज नोटीस’ बजावण्यात आली असून प्रशासनाकडून कारवाईचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.
१ मे हा दिवस महाराष्ट्राच्या स्थापनेचा, त्याग आणि शौर्याचा साक्षीदार आहे. या दिवशी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करून शहीद हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात येते. मात्र, मोताळा पंचायत समितीमध्ये शिस्तभंग करत २१ कर्मचारी अनुपस्थित राहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Vidarbha Farmers : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी एल्गार, SDO कार्यालयावर धडकले!
कनिष्ठ लेखाधिकारी के.व्ही. हिवाळे, आरोग्य सेवक पी.एन. वैराळकर, वरिष्ठ सहायक ए.एस. भिसे, कु. व्ही.एस. डांगे, कु. व्ही.एस. लाखाडे, क.स. कासीफ अन्सारी, अशरफ बशीर, सी.टी. पाटील, ऐश्वर्या गिरी, पी.जे. राजपूत, मंगला घुगे, अरुण क्षीसरसागर, प्रवीण चांभारे, एन.व्ही. घट्टे, एस.एस. मोरे, रमाकांत पाटील, रुपेश झंवर, माणिक जाधव, दीपाली मेढे, शुभांगी मेहत्रे – अशा एकूण २१ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
Uddhav Thackrey Shivsena : रिकाम्या खुर्चीला हार घालून गांधीगिरीतून निषेध!
या प्रकरणी प्रभारी गटविकास अधिकारी बी.बी. हिवाळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “ध्वजारोहणास अनुपस्थित राहिलेल्यांकडून स्पष्टीकरण मागवले आहे. समाधानकारक उत्तर न दिल्यास प्रशासकीय कारवाई केली जाईल.” दरम्यान, काही कर्मचारी इतर कार्यालयांमध्ये हजर होते का? याचा तपास केला जात असून प्रमाणपत्राद्वारे उपस्थिती सिद्ध करता आली, तर सूट मिळू शकते. मात्र, जे कर्मचारी प्रत्यक्ष ध्वजारोहणास अनुपस्थित होते, त्यांच्यावर कारवाई अटळ असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.