व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir Mungantiwar : अहिल्यादेवींनी राज्य जिंकण्यासाठी नव्हे तर रयतेचे मन जिंकण्यासाठी कार्य...

Sudhir Mungantiwar : अहिल्यादेवींनी राज्य जिंकण्यासाठी नव्हे तर रयतेचे मन जिंकण्यासाठी कार्य केेले !

“Ahilyadevi didn’t aim for power — she won the hearts of her people!” : त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वातून विचारांचा तेच घेण्याचा प्रयत्न करावा

Chandrapur : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी न्यायप्रिय प्रशासन, धार्मिक स्थळांचे जिर्णोद्धार आणि जनकल्याणकारी कार्ये यांमुळे जनतेने त्यांना पुण्यश्लोक ही उपाधी दिली. इतर राज्यकर्त्यांनी भौगोलिक क्षेत्र जिंकण्यासाठी राज्य केले पण अहिल्यादेवींनी रयतेचे मन जिंकण्यासाठी राज्य केले, असे राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा ग्रामीण व महानगर तसेच भाजप युवा वॉरियर्सच्यावतीने चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहामध्ये आयोजित युवा संमेलनात आमदार मुनगंटीवार बोलत होते. संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध वक्ते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी मार्गदर्शन केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, महानगराचे अध्यक्ष राहुल पावडे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, महानगराचे अध्यक्ष विशाल निंबाळकर, डॉ. मंगेश गुलवाडे, सविता कांबळे, संध्या गुरनुले, राखी कंचर्लावार, आशिष देवतळे, अल्का आत्राम, रामपाल सिंग, सुरज पेदुलवार, किरण बुटले, अनिल डोंगरे, अमित गुंडावार, तनय देशकर यश बांगडे, प्रवीण तायडे, गणेश रामगुंडावार, ओम पवार आदिंची उपस्थिती होती.

Farmers in trouble : विजेच्या लपंडावावर ताबडतोब उपाय करा !

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवनकार्यातून देशभक्ती, सेवा आणि त्याग यांची शिकवण घेऊन युवकांना समाजपरिवर्तनासाठी त्यांचा आदर्श आत्मसात करावा, असे आवाहन आमदार मुनगंटीवार यांनी केले. ३०० वर्षांपूर्वी अहिल्यादेवी होळकर यांनी समाजाच्या मनामनामध्ये जे रुजवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वातून तेज घेण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा, असेही ते म्हणाले.

Heavy rain in Vidarbha : रेती वाहतुकीचे रस्ते बंद, मुनगंटीवारांनी ३० जून पर्यंत वाढवून मागितली मुदत !

चंद्रपूर जिल्ह्याला कुणी मागास समजू नये. भारत – चीन युद्धात सर्वाधिक सोन्याचे दान देणारा जिल्हा चंद्रपूर आहे. बाबा आमटे यांच्या समाजसेवेचा संदेश देणारा हा जिल्हा आहे. सहनशीलतेला गुणांची, कार्याची जोड द्या. गुणवान होण्याचा संकल्प करा, असे आवाहनदेखील आमदार मुनगंटीवार यांनी केले. तरुणांच्या कार्यगुणांमुळे २०४७ साली आपला देश नक्कीच जगातील बलाढ्य देशांना मागे टाकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Sudhir Mungantiwar : विकासाचे अध्वर्यू – नितीन गडकरी

डॉ. सचिच्दानंद शेवडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनचरित्र, त्यांचा राज्यकारभार, धर्मकार्य या सर्व बाबींवर आपल्या अनोख्या शैलीतून प्रकाश टाकला. पतीचे निधन झाल्यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी स्वतःच्या क्षमता ओळखून राज्यकारभार पुढे नेला नाही तर जनदेच्या हिचाता कारभार केला. या घटनांचे उदाहरण देते डॉ. शेवडे यांनी तरुणांना स्वतःच्या क्षमता ओळखून पुढे जाण्याचा सल्ला दिला.

Sudhir Mungantiwar : अपघातग्रस्तांसाठी देवदूत ठरले मुनगंटीवारांचे जनसंपर्क वाहन

थोड्याशा अपयशाने क्षुल्लक करणांवरून आत्महत्या करण्याच्या घटना क्लेषदायक आहेत. अहिल्यादेवींनी एकीकडे राजकारण केले. पण दुसरीकडे धर्मकारणदेखील केले. स्वतःचे सामर्थ्य ओळखत आपली आवड ओळखा आणि त्यानुसार करिअर निवडा. कोणत्याही गोष्टीचा न्यूनगंड बाळगू नका. प्रत्येक गोष्टीचा सकारात्मरित्या विचार करून पुढे वाटचाल करण्याचा मंत्रही डॉ. शेवडे यांनी दिला. स्वतःच्या डोळ्यांपुढे पती, सासरे मरण पावले, पोटची मुलगी सती केली असताननाही अहिल्यादेवी कधी खचल्या नाहीत. त्यांच्या चरित्रातून प्रेरणा घ्या, अपयशाने खचून जाऊ नका, असे आवाहनही डॉ. शेवडे यांनी केले.

error: Content is protected !!