MLA Sudhir Mungantiwar’s appeal to women on the occasion of Ahilyabai Holkar’s tercentenary birth anniversary : चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीतर्फे महिला मेळाव्याचे आयोजन
Chandrapur : पुण्यश्लोख अहिल्यादेवींचे स्मरण आपण आज ३०० वर्षांनंतरही करतो. यामागचे एकच कारण आहे, ते म्हणजे त्यांनी भुभाग जिंकण्यासाठी नव्हे, तर जनतेच्या हृदयात स्थान मिळवण्यासाठी कार्य केले. महिलांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आत्मनिर्भरता, आत्मसन्मान आणि सामाजिक परिवर्तनाचा वसा घ्यावा, असे आवाहन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
गरिबांना न्याय मिळावा, जनतेला पाणी व अन्न मिळावे यासाठी त्यांनी राज्यकारभार केला. त्यांनी समाजासाठी विहिरी बांधल्या, अन्नछत्रे सुरू केली. काशी विश्वनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारात योगदान दिले. समाजाच्या कल्याणासाठी आयुष्य वाहिलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे आर्दश घेत आपण समाजाची सेवा करण्याचा संकल्प करावा, असेही आमदार मुनगंटीवार म्हणाले. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीतर्फे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
Chandrapur : मुनगंटीवारांनी घेतला विसापूर येथील निर्माणाधीन एसएनडीटी महिला विद्यापीठाचा आढावा !
कार्यक्रमात ‘सिंदूर तिरंगा यात्रा’च्या माध्यमातून महिला शक्तीने उत्स्फूर्तपणे देशभक्तीचा जल्लोष साजरा केला. भाजपाच्या युवा महिला मोर्चाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात “भारत माता की जय”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले, महीला मोर्चा प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, महीला मोर्चा अध्यक्ष वंदना शेंडे,महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, रत्नमाला भोयर, मंगेश गुलवाडे, उषाताई शेंडे, चंदू मारगोनवार, किरणताई बुटले, नीलम सुरमवार, डॉ. किरण कापगते, शर्मा मॅडम, नम्रता ठेमस्कर, वीरमाता ताराबाई आत्राम, जनाबाई दास आदी उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्त्रीशक्तीचा शाश्वत आणि तेजस्वी वारसा समाजापुढे ठेवला आहे. राज्यकारभार सांभाळताना त्यांनी आदर्श समाजाची रचना केली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत नारीशक्ती पुढे आली, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या संकल्पनेतील समाज साकार होईल. त्यामुळे त्यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेऊन समाजसेवेचा संकल्प करा, असे आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी १५ कुटुंबांना मिळवून दिली सव्वा कोटीची नुकसान भरपाई !
एक आई आपल्या मुलाला देशाचे रक्षण करताना गमावते, ही भावना शब्दातीत आहे. आपल्या रक्षणासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्य महिनोन्महिने सीमांवर असतात. या मातांच्या त्यागाला माझा सलाम. आपण जर खरंच पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अभिवादन करायचे असेल, तर त्यांच्या मार्गावर चालत समाज आणि देशसेवेसाठी एकत्र येत, समाजाची प्रगती केली पाहिजे हीच खरी आदरांजली ठरेल, असेही आवाहन आमदार मुनगंटीवार यांनी केले.








