Eknath Shinde’s Shiv Sena MLA criticizes his own government : राज्यावरील आर्थिक भार वाढला, सव्वा लाख कोटींची तूट
Buldhana : बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड रोखठोक आणि तोडफोड विधाने करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अधूनमधून ते आपल्याच लोकांना कानपिचक्या देत असतात. यामुळे ते स्वतःवर अनेक वादही ओढवून घेत असतात. आता त्यांनी आपल्याच सरकारवर शरसंधान साधले आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्य संकटात आल्याचे वक्तव्य त्यांनी केले. आता या वक्तव्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात काय पडसाद उमटतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आमदार गायकवाड यांनी पुन्हा एकदा ठसक्याच्या आणि स्पष्ट वक्तेपणाच्या शैलीत राजकीय घडामोडींवर आणि आर्थिक स्थितीवर भाष्य केले आहे. बुलढाण्यात एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘लाडक्या बहीणींमुळे राज्य आर्थिक संकटात सापडले आहे’. असे म्हणत त्यांनी थेट राज्य सरकारच्या धोरणावरच बोट ठेवले आहे.
International Diabetes Conference : मुख्यमंत्री बनले डॉक्टर, दिल्या मधुमेह टाळण्याच्या टीप्स !
महाराष्ट्रावर सध्या सव्वा लाख कोटी रुपयांची तूट आहे. लाडक्या बहीणींसाठी जाहीर झालेल्या योजनांमुले हा आर्थिक भार जास्तच वाढला आहे, हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही, असे म्हणत त्यांनी महिलांसाठीच्या योजना आणि त्यावर सरकार करत असलेल्या खर्चावर प्रश्नचिन्ह लावले आहे.
सद्यस्थितीत महाराष्ट्रात हॉट टॉपीक असलेल्या उद्धव – राज ठाकरे यांच्या युतीबाबतही आमदार गायकवाड यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांपासून दूर जाऊन आघाडीचं राजकारण केलं. त्यामुळे त्यांचा जनाधार संपलेला आहे. आता राज आणि उद्धव एकत्र आले, तरी त्याचा फारसा उपयोग होणार नाही.
Pradhan Mantri Awas Yojana : सामान्यांना दोन खोल्यांच्या घराची अपेक्षा, कामे पूर्ण करा !
या दोघांनी जर दहा-पंधरा वर्षांपूर्वीच एकत्र येण्याचा निर्णय घेतला असता, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र वेगळं असतं. मात्र आता हे केवळ कालबाह्य प्रयत्न ठरतील. आमदार संजय गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यांच्या विधानांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या चर्चांना उधाण येण्याची शक्यता आहे.








