Many were expelled for doing anti-party work : पक्षविरोधी कार्य केल्यामुळे अनेकांवर वेळ; भूमिकेकडे लक्ष
Akola लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कार्य केल्यामुळे भाजपमधून निष्काशीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आता काँग्रेसचा हात धरण्याची तयारी चालवली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पुनर्वसन होणे गरजेचे आहे. त्यामुळे हे पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराविरोधात छुप्या पध्दतीने व उघडपणे कार्य करणाऱ्या काही माजी नगसेवक व पदाधिकाऱ्यांना पुढील सहा वर्षांपासाठी भाजपमधून निष्काशित करण्यात आले आहे. भाजपचे निष्काशित काही माजी नगरसेवक काँग्रेस पक्षाच्या वाटेवर आहेत. त्यांची प्राथमिक चर्चादेखील काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेतृत्वासोबत झाल्याची माहिती आहे. तसे झाले तर निश्चित काँग्रेस पक्षाला चांगलेच बळ मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम केल्याने आणि प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने याबाबतची गांभीर्याने दखल घेऊन अकोला शहरातील काही माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना पक्षातून पुढील सहा वर्षांसाठी निष्काशित केले आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्यापूर्वी राजकीय पुनर्वसन होणे गरजेचे असल्याने भारतीय जनता पक्षाच्या निष्काशित काही माजी नगरसेवकांनी काँग्रेस पक्षासोबत प्राथमिकस्तरावर बोलणी सुरू केली आहे. त्याअनुषंगाने स्थानिक जबाबदार पदाधिकाऱ्यांच्या ते संपर्कात असल्याची माहिती आहे.
Tiger hunting by electrick shock : शॉक देऊनच केली वाघीणीची शिकार !
पराभवानंतर झाली होती कारवाई
भाजप महायुतीचे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार विजय अग्रवाल यांचा अवघ्या १ हजार १३४ मतांनी पराभव झाला आहे. ही बाब भारतीय जनता पक्षाने अतिशय गांभीर्याने घेतली. पक्षविरोधी कार्य करणाऱ्यांना भाजपमधून सहा वर्षांसाठी निष्काशित करून त्यांना घरचा रस्ता दाखविला आहे.
कोण धरणार काँग्रेसचा हात?
भाजपातर्फे करण्यात आलेल्या कारवाईची कोणतीही तमा न बाळगता त्यांनी आता कमळला सोडून पंजाला साथ देण्याचा जवळपास निर्णय घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे. त्यानुसार भारतीय जनता पक्षाच्या निष्काशित माजी नगरसेवक व काही पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाच्या जबाबदार नेतृत्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्राथमिक गाठभेट झाल्याची माहिती आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांचे जोरकसपणे प्रयत्न सुरू आहेत. भाजपाचे निष्काशित कोणते माजी नगरसेवक आणि पदाधिकारी काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. याकडे राजकीय वर्तुळासह जिल्ह्यावासियांचे लक्ष लागले आहे.